शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा रिलायन्स इन्फ्राकडून महामार्गाचे काम काढून घ्या, गिरीश बापट यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:50 IST

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनसुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे.

पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनसुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. या रस्त्याचे उर्वरित काम तत्काळ सुरू न केल्यास हे काम रिलायन्स इन्फ्राकडून काढून घ्यावे, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस. डी. चिटणीस आदी प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना बापट यांनी प्रशासकीय अधिकाºयांना दिल्या. रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त होण्यासाठी या कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी सांगितले.प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी -चिंचवड महापालिकेने काढून टाकल्याने काम सुरू करण्यात अडथळा येणार नाही.चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तळेगाव चाकण-शिक्रापूर नावरा चौफुला या रस्त्यावरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊशकते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे नमूद करून या रस्त्याची स्वत: प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.१५ दिवसांनी घेणार आढावा...ज्ञानेश्वर व तुकाराममहाराज पालखी मार्गाच्या कामाचा बापट यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत जबाबदारी निश्चित करून काम जलद गतीने काम पूर्ण होईल, याचे नियोजन करावे, असेही बापट यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे