शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅस्कर’चे कार्यालय लवकरच मुंबईत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:34 IST

- नम्रता फडणीस पुणे : आॅस्कर अकादमीचे कामकाज कसे चालते, आॅस्कर पुरस्काराशिवाय अकादमी नक्की कोणते उपक्रम राबविते याची माहिती भारतीयांना व्हावी; तसेच संवाद आणि आदानप्रदानाचे दालन खुले व्हावे यासाठी ‘लॉस एंजिलिस’,‘न्यूयॉर्क’ आणि ‘लंडन’प्रमाणेच मुंबईमध्येही आॅस्कर अकादमीचे कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारबरोबरच विविध प्रकल्प राबविण्याची आॅस्कर अकादमीची इच्छा असल्याने केंद्राच्या ...

- नम्रता फडणीस पुणे : आॅस्कर अकादमीचे कामकाज कसे चालते, आॅस्कर पुरस्काराशिवाय अकादमी नक्की कोणते उपक्रम राबविते याची माहिती भारतीयांना व्हावी; तसेच संवाद आणि आदानप्रदानाचे दालन खुले व्हावे यासाठी ‘लॉस एंजिलिस’,‘न्यूयॉर्क’ आणि ‘लंडन’प्रमाणेच मुंबईमध्येही आॅस्कर अकादमीचे कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारबरोबरच विविध प्रकल्प राबविण्याची आॅस्कर अकादमीची इच्छा असल्याने केंद्राच्या एनएसडी किंवा फिल्म डिव्हिजनमध्ये या कार्यालयासाठीच्या जागेला प्राधान्य दिले जाणार आहे.आॅस्कर अकादमीच्या सदस्य डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांनी अकादमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांच्यापुढे आॅस्कर अकादमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. डॉ. निरगुडकर यांनी डॉन हडसन यांच्याशी अकादमीच्या पहिल्याच भेटीदरम्यान आॅस्कर आणि भारतीय चित्रपटांची नाळ कशी जोडता येईल, भारतात कोणते प्रकल्प आणता येणे शक्य होईल, याविषयी चर्चा केली. भारतात तेही मुंबईत अकादमीचे कार्यालय निर्माण करण्याची इच्छा त्यांनी हडसन यांच्यासमोर व्यक्त केली. मात्र हा धोरणात्मक निर्णय असल्याने आॅस्कर अकादमीच्या प्रशासकीय मंडळासमोर हा प्रस्ताव मांडावा लागेल, असे त्या म्हटले असल्याचे निरगुडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅस्कर अकादमीचे कार्यालय मुंबईत असेल, तर सदस्यांची भारतात ये-जा राहील. त्यातून एक संवादाचा पूल निर्माण होईल. भारतीय चित्रपट जगभरात पोहोचविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. हे कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाशीही चर्चा केली जाणार असून, फिल्म डिव्हिजन किंवा एनएसडी मध्ये कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार आहे.