शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 08:54 IST

रक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे...

पुणे: जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता अमलांत आली असून निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ११ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला ११ ऑगस्टपर्यंत स्वतःजवळ परवाना प्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास‍ मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या प्रमुखावर राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील ६ पोलीस स्थानक हद्दीतील एकूण २९ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्थानकाला जमा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

 शस्त्रपरवाना धारकांनी आदेश प्राप्त होताच ताबडतोब व कोणत्याही परिस्थीतीत सात दिवसाच्या आत शस्त्र जमा करावीत. बारामती तालुका पोलीस स्थानक हद्दीतील ९, वाचलंदनगर पोलीस स्थानक हद्दीतील ३, इंदापूर पोलीस स्थानक हद्दीतील १, शिरुर पोलीस स्थानक हद्दीतील ११, हवेली पोलीस स्थानक हद्दीतील ५ असे २९ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करुन घेण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शस्त्र जमा करताना शस्त्रे ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक