शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बालक भाजल्याप्रकरणी हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश; पुणे महापालिकेने केली कारवाई, बालकाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:29 IST

काचेच्या पेटीला आग लागून आतील नवजात बालक गंभीर जखमी झाल्याप्रकरणी महापालिकेने सुमोटो कारवाईचा बडगा उचलला आहे. वात्सल्य हॉस्पिटल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी बजावले आहेत.

पुणे : काचेच्या पेटीला आग लागून आतील नवजात बालक गंभीर जखमी झाल्याप्रकरणी महापालिकेने सुमोटो कारवाईचा बडगा उचलला आहे. वात्सल्य हॉस्पिटल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी बजावले आहेत. बालकाची प्रकृती गंभीर असल्याचे त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.बुधवार पेठेतील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी काचेच्या पेटीला आग लागून आतमधील नवजात बालक ९० टक्के भाजले. याप्रकरणी डॉ. गौरव चोपडे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला नंतर दुसºया एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सर्वतोपरी उपचार करण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी विजेंद्र विलास कदम (वय ३५, रा. शुक्रवार पेठ) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.महापालिकेच्या सहायक आरोग्याधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वात्सल्य हॉस्पिटल २७ सप्टेंबर २०१७ पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. हॉस्पिटलच्या इन्क्युबेटरला आग लागून बालक जखमी झाल्याचा प्रकार गंभीर असून यामध्ये हॉस्पिटलचा निष्काळजीपणा आढळून येत आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही नवीन रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेऊ नये, तसे केल्याचे आढळून आल्यास आपणास जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.नोंदणी रद्द करण्याचे अधिकारबॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टनुसार सर्व हॉस्पिटलची महापालिकेकडे नोंदणी केली जाते.पुणे शहरात ६६८ नोंदणीकृत हॉस्पिटल आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र, व्यावसायिक कर नोंदणी आदी कागदपत्रांची तपासणी करून त्यांची पालिकेकडे नोंदणी केली जाते.हॉस्पिटलकडून रुग्णांच्या उपचारामध्ये कुचराई झाल्याचे निर्दशनास आल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार पालिकेला आहेत. त्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.महापालिकेने हॉस्पिटलबरोबर शहरातील डॉक्टरांचीही नोंदणी करण्याची प्रक्रिया राबविली आहे. याअंतर्गत ४ हजार ५०० डॉक्टरांची नोंदणी पालिकेकडे झाली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल