शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कापडी पिशव्यांच्या बॅँकेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:22 IST

औंधमधील इरेना टॉवर सोसायटीमधे कापडी पिशव्यांची बॅँक तयार करण्यात येत आहे.

पाषाण : प्लॅस्टिकच्या पिशव्या बंद झाल्यानंतर नागरिकांना दुसरा पर्याय हवा होता. आजदेखील पर्याय नसल्याने अनेक जण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. आता यावर कापडी पिशव्यांची बॅँक करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याचे बंद होऊन कापडी पिशव्यांचा वापर वाढू शकतो.औंधमधील इरेना टॉवर सोसायटीमधे कापडी पिशव्यांची बॅँक तयार करण्यात येत आहे. इरेना टॉवर ही २८० फ्लॅटची सोसायटी आहेत. पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होत सोसायटीमधील नागरिकांनी प्रत्येक फ्लॅटमध्ये कापडी पिशव्या वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. कापडी पिशव्यांची बॅँक तयार करण्यात आली. सोसायटीतल्या लोकांनी काही फ्लॅटसाठी सोसायटीचे नाव असलेल्या आकर्षक कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. पर्यावरण दिनानिमित्त सर्व फ्लॅटमध्ये कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प सोसायटीच्या सभासदांनी केला आहे. समर्थ भारतने केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कापडी पिशवी बँक तयार होते आहे, असे सामाजिक कार्यकर्ते गणेश कलापुरे यांनी सांगितले.शुभा कुलकर्णी, अभिलाषा वर्मा आणि स्वाती कुलकर्णी या सोसायटीतील गृहिणींनी याबाबत पुढाकार घेतला आहे आणि प्रत्येक कुटुंबात कापडी पिशवी वापर व्हावा, म्हणून त्या प्रयत्न करीत आहेत. औंधमधील इरेना टॉवर सोसायटी २८० फ्लॅटची आहे तिथे शुभारंभ झाला आहे. आत्तापर्यंत सोसायटीतल्या लोकांनी ३० पिशव्या तयार केल्या आहेत. अजून करणार आहेत. लोक पिशव्या तयार करीत आहेत आणि कापडी पिशवी बँक तयार होत आहे.१०० सोसायट्यांमध्ये कापडी पिशवी बँकप्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी प्लॅस्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा, या उद्देशातून समर्थ भारत आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी मिळून कापडी पिशवी बँक हा अभिनव उपक्रम राबविला आहे.५ जून जागतिक पर्यावरण दिन आहे. या वर्षी या दिनाचा यजमान भारत देश आहे, याचे औचित्य साधून हा उपक्रम पुणे शहराच्या किमान १०० सोसायट्यांत कापडी पिशवी बँक हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्लॅस्टिकबंदी, प्लॅस्टिक निर्मूलन, पर्यावरणरक्षण आणि प्रदूषणमुक्त नदी होण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच चांगला उपयोग होईल. हा उपक्रम लोकांनी लोकांसाठी राबविला आहे आणि प्रदूषणमुक्तीसाठी ही एक मोठी चळवळ उभी राहत आहे. यात विविध निवासी सोसायट्यांनी आपला सहभाग वाढवावा, असे गणेश कलापुरे म्हणाले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीbankबँक