शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप कुरुलकर परत पाकिस्तानबरोबर संपर्क साधण्याच्या शक्यतेमुळे जामीनाला विरोध

By नम्रता फडणीस | Updated: August 25, 2023 17:28 IST

बचाव पक्षाच्या अर्जावर त्यांनी लेखी उत्तर शुक्रवारी न्यायालयात सादर केले....

पुणे : संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) चा संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हा वरिष्ठ पदावर कार्यरत असताना त्याने पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्रांची माहिती दिली असून, त्यानेमोबाइलमधील डेटा डिलीट केला आहे. तो डेटा रिकव्हर करायचा आहे. त्याला जामीन दिल्यास तो परत पाकिस्तानबरोबर संपर्क साधण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगत सरकारी वकिलांनी डॉ. कुरुलकर याच्या जामिनाला विरोध केला असून, बचाव पक्षाच्या अर्जावर त्यांनी लेखी उत्तर शुक्रवारी न्यायालयात सादर केले.

डॉ. कुरुलकरने याने ऍड ॠषीकेश गानू यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपी हा मे महिन्यापासून कारागृहात असून, जुलैमध्ये आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे सरकारी वकिलांना मुदत देणे योग्य होणार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने सरकारी पक्षाला शुक्रवारी (दि.25) लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारी वकीलऍड विजय फरगडे यांनी जामिनाला विरोध करीत न्यायालयात अर्जावर लेखी उत्तर सादर केले. आरोपी हा वरिष्ठ अधिकारी असल्याने तो इतर साथीदारांवर दबाव आणू शकतो व त्याला जामीन दिल्यास तो पाकिस्तानशी परत संपर्क साधू शकतो अशी कारणे त्यांनी उत्तरामध्ये नमूद केली आहेत. कुरुलकरच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी (दि.29) सुनावणी होणार आहे.

कुरुलकरचा मोबाइल गुजरातला पाठविण्यास न्यायालयाने दिली परवानगी कुरुलकर याने मोबाइलमधील डेटा डिलिट केला असल्याने तो रिकव्हर करण्यासाठी त्याचा मोबाइल गुजरातच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्याबाबत सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जाला शुक्रवारी न्यायालयाने मंजूरी दिली.

एटीएसकडून कुरुलकरची 19  ते 24 एप्रिल दरम्यान प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यात यावा असा अर्ज कुरुलकरचे वकील अँड ॠषीकेश गानू यांनी न्यायालयात  शुक्रवारी दाखल केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड