शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी नेत्यांच्या खासगी कारखान्यांसाठी विरोध

By admin | Updated: June 25, 2017 04:28 IST

खासगी साखर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर राज्यात अग्रगण्य असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरण आवश्यकच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : खासगी साखर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर राज्यात अग्रगण्य असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरण आवश्यकच आहे. त्याचबरोबर कारखान्याचे विस्तारीकरणदेखील शासनाकडे सादर केलेल्या परवानग्या मिळाल्यानंतर केल्या जातील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या खासगी कारखान्यांना अडचण होईल, म्हणून त्यांचे संचालक विरोधासाठी विरोध करीत आहेत, अशी टीका कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी केली.कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारवाढीच्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. माळेगाव कारखान्याच्या ऊस उत्पादकांना जादा दर मिळावा, हीच आमची भूमिका आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हेच खुपते. या कारखान्याने जादा दर दिला तर खासगी कारखान्यांना देखील जादा दर द्यावा लागतो. आता स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेच्या काळात जुन्या यंत्रणेवर काम करणे अडचणीचे आहे. सुरुवातीला १ हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेवरून आता ४ हजार मेट्रीक टनावर गाळप क्षमता नेली. २१ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. बॉयलिंग हाऊसमधील पॅन वापरणे धोकादायक असल्याचा अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने दिला आहे. त्याच अनुषंगाने आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी...प्रदूषण नियंत्रण मंडळाने अटी घातल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी प्रक्रियाद्वारे नवीन इव्हॉपोरेशन प्रकल्पामुळे स्पेन्टवॉशची विल्हेवाट शक्य होणार आहे. पाणीप्रक्रिया प्रकल्पामुळे २ कोटी लिटर पाण्याची बचत होणार, यासाठी व्हीएसआयने प्रकल्प अहवाल सादर केले आहेत. साखर आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे तिन्ही प्रकल्प मार्गी लावणे क्रमप्राप्तच आहे, असे त्यांनी सांगितले. आधुनिकीकरणाला ‘असुयेतून’ विरोध...सहवीजनिर्मिती प्रकल्पदेखील २१ मेगाव्हॅटवरून २८ मेगाव्हॅटपर्यंत नेण्यात येणार आहे. जे चांगले आहे ते करण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रवादीच्या नेत्यांना असुया येते. विशेष म्हणजे २००७ मध्येच ठराव झालेल्या विषयांची कामे आम्ही पूर्ण करत आहोत. खोटे बोलून रेटून नेण्याचा विरोधकांचा प्रयत्न...नवीन आले ते स्वीकारण्याची आमची भूमिका आहे. भविष्यातील पिढीसाठी कारखाना राज्यात गुणवत्तेच्या बाबतीत अग्रगण्य राहावा, हीच भूमिका आहे. तरच कारखाना स्पर्धेत टिकणार. परंतु, विरोधी संचालकांनी प्रकल्प होऊ नये, यासाठी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात त्यांचे म्हणणे टिकले नाही. आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत जे विषय घेतले, त्याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यांनी लेखी विरोध नोंदविलेला आहे. तरी देखील खोटे बोलून रेटून नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या संचालकांचा आहे, असेही चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी सांगितले.विस्तारीकरण होणारच...आधुनिकीकरणानंतर कारखान्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. साधारणत: साडेसात हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेचा कारखाना होईल. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या राज्य सरकारकडे मागितल्या आहेत. त्या मिळाल्यानंतर विस्तारीकरण होणारच आहे, असेही त्यांनी सांगितले. कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पोंदकुले, संचालक शशिकांत कोकरे, चिंतामणी नवले, जवाहर इंगुले, प्रशांत शिंदे, अविनाश देवकाते, सुरेश खलाटे, प्रमोद गावडे, विनोद तावरे, संजय तावरे, संग्राम काटे आदी यावेळी उपस्थित होते.