घोटवडे: प्रस्तावित रिंगरोडमुळे मुळशी येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी जमिनींची मोजणी करण्यास विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी घोटवडे मंडळ कार्यालयाचे मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड, गाव कामगार तलाठी आदमवाड, तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी अधिकारी गायकवाड, महाराष्ट्र्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी पाटील यांना दिले आहे. शेतकऱ्यांचे म्हणजे ऐकल्याशिवाय मोजणी करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. याप्रसंगी रिंगरोड विरोधी कृती समिती अध्यक्ष माणिकराव शिंदे, उपसरपंच अविनाश खाणेकर, उपसरपंच सविता गवारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष पोपट शिंदे, बारकू गवारे, राम गवारे, मंगेश शिंदे, प्रभाकर गवारे, अशोक उबाळे, सुनील कडू तसेच रिंगरोड बाधित खातेदार यावेळी उपस्थित होते.
पिंपळोली रिंगरोड मोजणीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST