शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय मोर्चा

By admin | Updated: March 26, 2017 02:32 IST

महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा विजय हा मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच झाला आहे, असा

पुणे : महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा विजय हा मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच झाला आहे, असा आरोप करीत विविध पक्षांमधील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या विरोधात शनिवारी मोर्चा काढला. यापुढील प्रत्येक निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घेतले जावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. महापालिका निवडणुकीतील भाजपा वगळता विविध पक्षांचे पराभूत उमेदवार मोर्चात सहभागी झाले होते. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, तेहसीन पूनावाला, रूपाली पाटील, प्रशांत कनोजिया, मयूरी शिंदे, कमल व्यवहारे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्तेही उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, भाजपाचा विजय मतदान यंत्रांतील घोटाळ्यामुळेच झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदान झाल्यानंतर, मतदाराला त्याने कोणाला मतदान केले आहे याची माहिती देणारी पावती द्यावी, असा आदेश दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून निवडणुका घेण्यात येत आहेत. शनिवारवाड्यापासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात मतदान यंत्रासंबधी तक्रारी करण्यात आल्या.(प्रतिनिधी)मतदानानंतर पावती मिळावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेतील चर्चेत शुक्रवारी मतदान यंत्रासंबंधींचा विषय उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी शनिवारी पुण्यात विभागीय आयुक्तांना मतदान यंत्राबाबत शंका घेणारे निवेदनही दिले. त्यात त्यांनी मतदान झाल्यानंतर, मतदाराला त्याच्या मतदानाची पावती मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली. भारतीय लोकशाही टिकवायची असेल, तर ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता, बॅलेट पेपरवर घ्यावे. ईव्हीएम मशीनद्वारे दिलेले मत मतदाराला पाहता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. पुणे महापालिका निवडणुकीत ४१ प्रभागांत पाहणी केली असता, १५ प्रभागांत निवडणूक जाहीर केलेल्या आकडेवारीत १० टक्के मते कमी असल्याचे दिसते, तर उर्वरित प्रभागात झालेल्या मतदानापेक्षा १० टक्के मते जास्त आढळली आहेत . या गैरप्रकाराची दखल घेऊन निवडणूकआयोगाने पुन्हा निवडणूक आणि ती मतपत्रिकेवर असावी, अशी मागणी करण्यात आली.