शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमार संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:50 IST

उजनी धरण : मासेमारी व्यवसायावर होणार विपरीत परिणाम

भिगवण : उजनी धरणात होणाऱ्या तरंगत्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प झाला तर मासेमारी करणाºयांच्या जिवावर उदरनिर्वाह करणाºया २५ ते ३० हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन बाजू सरकारच्या समोर मांडण्यास सांगितले.

सरकारने नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मितीचे महत्त्व लक्षात घेत राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी असे प्रकल्प हाती घेतले असून, यात उजनी धरणातील होणाºया प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ५ हजार हेक्टर जलक्षेत्रावर १ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात ५ हजार जलक्षेत्रावर १ हजार अशी एकूण १० जलक्षेत्रावर २ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा प्रामुख्याने उजनी किनारी असणाºया शेतकºयांना दिवसा वीज मिळण्यात होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष सीताराम नगरे, कोषाध्यक्ष नंदकुमार नगरे, पुणे जिल्हा अध्यक्ष राजू नगरे, बाजार समितीचे सदस्य आबासाहेब देवकाते, राजेंद्र देवकाते यांनी निवेदन देत आपला विरोध दर्शविला.यातून मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार असून, तीस हजार मासेमारी करणारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक मासेमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. यासाठी गेल्या महिन्यात जलसमाधी आंदोलन करीत प्रकल्प झाला तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे जाहीर केले. याबाबत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत आपले म्हणणे सरकार दरबारी पोहोचवून प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे