शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

विमानतळाला शेतक-यांचा विरोधच , विजय शिवतारेंनी उतावीळ होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:49 AM

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत. यामुळे शेतक-यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. विमानतळविरोधी जनसंघर्ष समितीच्या वतीने याचा पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.या वेळी जि. प. सदस्य व जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांसह समितीचे सदस्य आणि बाधित गावांचे सरपंच उपस्थित होते.आमदार विजय शिवतारे हे आपल्या भागामध्ये विकासकामे करण्याऐवजी विमानतळासाठी उतावीळ झाल्याचे दिसून येत आहेत. जमिनीचे मालक शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे आहे. त्यांनी आंदोलने, मोर्चे काढून आपला तीव्र विरोध नोंदविला, असे झुरूंगे यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी विमानतळविरोधी जन संघर्ष समितीचे उपाध्यक्ष व कुंभारवळणाचे सरपंच अमोल कामथे, सहसचिव लक्ष्मण बोरावके तसेच मेमाणे-पारगावचे सरपंच बापू मेमाणे, एखतपूर-मुंजवडीच्या सरपंच लक्ष्मी काळुराम धिवार, उदाचीवाडीच्या सरपंच सुनंदा चंद्रकांत झेंडे, वनपुरीच्या सरपंच विद्या दत्तात्रय महामुनी यांसह जनसंघर्ष समितीचे सदस्य महादेव टिळेकर, जितेंद्र मेमाणे, विठ्ठल मेमाणे, रामदास होले, महादेव कुंभारकर, रामदास कुंभारकर, निवृत्ती कामथे, सतीश कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर आदी उपस्थित होते.जमिनी शेतकºयांच्या असून त्यांनी यापूर्वीही वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करून विरोध केला आहे. एक इंचही जमीन देणार नसल्याचे ठरविले आहे, असे असताना पुरंदरमध्येच विमानतळ होणार, असे बोलणारे शिवतारे कोण? असा सवाल या वेळी झुरंगे यांनी केला. शेतकरी विमानतळासाठी जमिनी देण्यास तयार नाहीत. यापूर्वी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी मेमाणे-पारगाव येथे झालेल्या बैठकीत शिवतारे यांनी विमानतळाबाबत मी शेतकºयांच्या निर्णयाबरोबर आहे, शेतकºयांना विमानतळ नको असेल तर मी होऊ देणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र त्यानंतर शिवतारे या भागात फिरकलेही नाहीत.