शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अधिसभेच्या स्थापनेस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 06:16 IST

शिक्षणक्षेत्राचा केंद्रबिंदू असणाºया विद्यार्थ्यांनाच राज्यातील विद्यापीठ निवडणुकांपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे सध्या केवळ संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधरांच्या निवडणुका घेऊन

पुणे : शिक्षणक्षेत्राचा केंद्रबिंदू असणाºया विद्यार्थ्यांनाच राज्यातील विद्यापीठ निवडणुकांपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे सध्या केवळ संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधरांच्या निवडणुका घेऊन अधिसभा स्थापन करण्यात येणार आहे; मात्र विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवणाºया राज्य शासनाचा विविध विद्यार्थी संघटनांकडून निषेध केला जात आहे. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधी नसणाºया अधिसभेच्या स्थापनेला विरोध केला जाईल, अशी भूमिकाही काही संघटनांनी घेतली आहे.नवीन विद्यापीठ कायद्यात विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींना विद्यापीठाच्या अधिकार मंडळात जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडता येतील, असे विद्यापीठ कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व अधिकाºयांनी सांगितले होते. जुना कायदा रद्द करून विद्यार्थी निवडणुकांसाठी नवीन नियमावली तयार केली जात आहे. जुना कायदा अस्तित्वात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमधून कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह (सीआर) युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह (युआर) यांचीही निवड करता येत नाही; तसेच नवीन कायद्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निवडणुका या खुल्या पद्धतीने होणार आहेत; मात्र एक शैक्षणिक सत्र संपून गेल्यानंतरीही, शासनाने विद्यार्थी निवडणुका कशा घेतल्या जातील, याबाबतची माहिती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची भावना आहे.राज्यात अमरावती, सोलापूर यांसारख्या विद्यापीठांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संस्थाचालक प्रतिनिधी व पदवीधरांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच प्राचार्य व प्राध्यापकांच्या मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र या निवडणुकीत विद्यार्थी कुठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे केवळ मत मिळवण्यासाठीच विद्यार्थी निवडणुकांची घोषणा केली होती का, असा सवाल संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ आपल्या विचारांच्या शैक्षणिक संस्थांमधील पदाधिकाºयांना व परिचित व्यक्तींना विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर बसविण्यासाठी निवडणुका होत आहेत. असाही आरोप संघटनांच्या पदाधिकाºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ