कुरुळी : इंद्रायणी नदीपात्रापासून ते आळंदीफाटा येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या २००४ साली झालेल्या रस्त्या वेळी येथील शेतकऱ्यांनी या रस्त्यावर विविध ठिकाणच्या नागमोडी वळणामुळे अनेक अपघात होत आहेत. पुणे-नाशिक महामार्गच्या सहापदरीकरण रस्त्याच्या जमीन संपादन मोजणी कामाला आमचा विरोध नसून आमच्या मागण्या व हे काम रस्ता कसा होणार आहे. या कामाची तपशीलवार माहिती शेतकऱ्यांना घ्यावी, अशी मागणी या वेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केली. या महामार्गावर दोन्ही बाजूने २२ मीटर, तर काही ठिकाणी कमी जास्त मार्किंग करून देत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.पुणे-नाशिक महामार्गच्या सहापदरीकरण रस्त्याची जमीन मोजणी होणार असल्याची नोटीस एक दिवस आधी नोटीस देऊन अचानक मोजणी सुरू केली. आणखी काही शेतकऱ्यांना नोटीस नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या मोजणी कामासाठी सर्व्हर शिरसाठ, माजी उपसरपंच एकनाथ सोनवणे, ग्रामसदस्य सागर मुऱ्हे, शेतकरी बाळासाहेब बागडे, लक्ष्मण मुऱ्हे, भाऊसाहेब कांबळे, गौतम कांबळे, कान्हू बागडे, बाबा बागडे, नीलेश बागडे, शांताराम बागडे, विनोद बागडे, राजू कांबळे, दादासाहेब मुऱ्हे, संभाजी बागडे, योगेश कांबळे, सागर बागडे, अर्जुन बागडे, अशोक सोनवणे, सावंता शिंदे, देवराम मुऱ्हे, उत्तम मुऱ्हे, देवराम बागडे, गणेश बागडे, तुकाराम बागडे, गणेश कांबळे, विकास कांबळे, उत्तम कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते.
कुरुळीकरांचा जमीन संपादनाला विरोध
By admin | Updated: November 13, 2016 04:15 IST