शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ योजनेतील संधी हुकली, हेच शल्य!

By admin | Updated: February 4, 2016 01:28 IST

राज्यातील अन्य प्रमुख शहरांशी तुलना केल्यास पिंपरी चिंचवड हे शहर स्मार्ट आहेच, काही कारणास्तव या शहराची स्मार्ट सिटी योजनेतील समावेशाची संधी हुकली, हेच शल्य बोचते आहे

पिंपरी : राज्यातील अन्य प्रमुख शहरांशी तुलना केल्यास पिंपरी चिंचवड हे शहर स्मार्ट आहेच, काही कारणास्तव या शहराची स्मार्ट सिटी योजनेतील समावेशाची संधी हुकली, हेच शल्य बोचते आहे. अशा भावना विविध क्षेत्रातील व्यकतींनी व्यकत केल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला नाही. त्यात राजकारण खेळले गेले असे आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु विकासकामात राजकारण नको, पक्ष-संघटना कोणत्याही असोत, शहराच्या विकासाबद्दलची त्यांची भूमिका एक हवी. तरच खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराच्या विकासाला दिशा देता येईल, असे मत शहरातील उद्योजक, व्यावसायिक, तसेच व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना पायाभूत आणि मूलभूत सुविधांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. पायाभूत सुविधांची मुबलकता उद्योग, व्यवसायाच्या वृद्धीस पूरक ठरत असते. औद्योगिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, व्यवसायाला चालना मिळेल, अशा पायाभूत सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित आहे, या भागात सुमारे सहा हजार छोटे-मोठे कारखाने आहेत. उद्योग-धंदे टिकून राहतील, या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश झाला. पिंपरी-चिंचवडचा समावेश होऊ शकला नाही.त्यामागे काय राजकारण आहे, याबद्दल अधिक चर्चा न करता, अजूनही वेळ गेलेली नाही. पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश होण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनासुनियोजित विकास साधायचा असेल, तर शहराचा बकालपणा दूर करावा लागणार आहे. स्वच्छता, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, मैला सांडपाणी व्यवस्थापन आणि उद्योग, विकासाला चालना देणारे प्रकल्प साकारले पाहिजेत. जसे उद्योग, व्यवसाय शहरात यावेत, यासाठी प्रयत्न केले जातात. तसे उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्था शहरात याव्यात, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. प्राधिकरण, महापालिका, एमआयडीसी या संस्थांनी शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यावर भर दिला पाहिजे. - अशोक पगारिया, अध्यक्ष: प्रत्यक्ष कर समिती, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सशहरातील विविध संघटना, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना एकत्रित घेऊन स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू एकत्रित न येता, आपापल्या पातळीवर प्रयत्न करून श्रेयवाद पुढे आला.राजकारण खेळले जात आहे. आगामी काळात निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते. लोकप्रतिनिधी अपयशी ठरले, स्मार्ट सिटीत समावेशाची संधी डावलली गेली असेच म्हणावे लागेल. - मारूती भापकर, निमंत्रक, पिंपरी चिंचवड नागरी कृती समिती