यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भोर तालुका आरोग्य अधिकारी सूर्यकांत कराळे, वेळू सज्याच्या मंडलधिकारी विद्या गायकवाड जेजुरी देवस्थानचे प्रसाद शिंदे, स्वामी नारायण मंदिराचे आनंद पटेल आणि विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी येथील कोविड केअर सेंटर आहे. मात्र अनेकदा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास सर्वांची धावपळ होत होती. हे लक्षात घेऊन याठिकाणी ऑक्सिजन बेड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाल्याने भोर तालुक्यातील अनेक कोविड रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
जेजुरी देवस्थान, वेळू येथील डब्ल्यूओएम कंपनी, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिर, मर्क्युरी कंपनी, श्रीकांत कुर्णी, दुर्गा मॅट्रिक कंपनी यांच्या सहकार्यातून हे ऑक्सिजन बेड सेंटर उभे राहिले आहे. तसेच शिंदेवाडी, ससेवाडी आणि वेळू ग्रामपंचायत यांचेही या ऑक्सिजन बेड सेंटरसाठी सहकार्य लाभले आहे.
या ऑक्सिजन बेड सेंटरमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध असतील, ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना यावेळी थोपटे यांनी केल्या.
जेजुरी देवस्थान, स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट न-हे, वोम कंपनी वेळू, दुर्गा मॅट्रिक, मर्क्युरी कंपनी, श्रीकांत कुर्णी यांच्या सहकार्याने या ४८ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
१३ खेड शिवापूर
ससेवाडी येथील कोविड सेंटरचे उदघाटन करताना.