शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फाटक उघडेच अन् रेल्वे गाडी आली, सुदैवानं जीवितहानी टळली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 01:51 IST

पुणे स्थानकावरून दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे रूळाने नेहमीप्रमाणे गाडी घेऊन जात असताना रेल्वे चालकाला दुरूनच पुढील फाटक बंद नसल्याचे लक्षात आले.

मांजरी : पुणे स्थानकावरून दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे रूळाने नेहमीप्रमाणे गाडी घेऊन जात असताना रेल्वे चालकाला दुरूनच पुढील फाटक बंद नसल्याचे लक्षात आले. फाटक सुरू असल्याने फाटकातून रस्ते वाहतूकही सुरू होती आणि इकडे रुळावरून रेल्वे येत होती. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकणार होते. सुदैवाने रेल्वे गाडीचा वेग कमी होता.चालकाने जोरात गाडीचा हॉर्न वाजविला आणि आकस्मिक ब्रेक दाबला. शेवटी फाटकाच्या आधीच काही अंतरावर ही गाडी थांबली आणि पुढील अनर्थ टळला. मांजरी बुद्रुक रेल्वेगेट क्रमांक तीनवर हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते दहा वाजून छप्पन मिनिटांच्या दरम्यान घडला. रेल्वेचालकाने दाखविलेल्या प्रसांगवधानाने मोठा अनर्थ टळला. रेल्वेगेट बंद होण्याचा सायरन वाजत असतानाही फाटकाच्या दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करत होती. त्यातच नेमक्या रुळावर वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे रेल्वेगेट बंद होत नव्हते आणि गेट बंद होत नसल्याने सिग्नल मिळत नाही, असे लक्षात आल्याने तसेच गेट उघडे असून वाहतूकही सुरू असल्याचे रेल्वे चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने फाटकापासून काही मीटर अंतरावर पुणे-दौंड-पंढरपूर ही रेल्वे गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर रुळावरील वाहतूक पुढे मागे करून गेट बंद करण्यात आले. त्यानंतर रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. यात सुमारे १६ ते २० मिनिटे रेल्वेचा खोळंबा झाला. तर वारंवार अशी घटना पाहणाºया नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.>...अशी घटना वारंवार घडतेमांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्रमांक तीनवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच गेट बंद होण्याचा सायरन वाजत असताना रिक्षा व टेम्पो चालकांची तसेच अवजड वाहनांची गेट पास करण्याची स्पर्धा सुरू असते.त्यामुळे नेमकी रेल्वे रुळावर वाहतूककोंडी होऊन गेट बंद करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यातच रेल्वे येत असते, अशी घटना येथे वारंवार घडत आहेत.