शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘मुक्त’ शिक्षणाचे दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 06:44 IST

शाळेत न जाता इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मुक्तपणे घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या

दीपक जाधवपुणे : शाळेत न जाता इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मुक्तपणे घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्टÑ राज्य मुक्त विद्यालय मंडळाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी मुक्त शिक्षणपद्धती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने १४ जुलै २०१७ रोजी महाराष्टÑ राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळामार्फत इयत्ता ५ वी, ८ वी, १० वी व १२ वी च्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या मंडळाकडून मिळणारे उत्तीर्णचे प्रमाणपत्र राज्य मंडळाशी समकक्ष असणार आहे.मुक्त विद्यालय मंडळाच्या परीक्षा मार्च/एप्रिल व आॅक्टोबर/नोव्हेंबर अशा वर्षातून दोन वेळा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परीक्षांपूर्वी ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये नावनोंदणी करावी लागणार आहे. एकदा केलेलीनोंदणी ही ५ वर्षांसाठी वैध धरली जाणार आहे. या नोंदणीद्वारे सलग ५ वर्षे किंवा सलग ९ परीक्षांची संधी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर पुनर्नोंदणीचीही सुविधा उपलब्ध असेल. मुक्त विद्यालय मंडळाचा अभ्यासक्रम हा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असणार आहे.या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रमांमध्ये लवचिकता असावी, शालेय अभ्यासक्रमामध्येच व्यावसायिक शिक्षण मिळावे, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विशेष व्यवस्था उपलब्ध व्हावी, आदी प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहेत. इयत्ता दहावीसाठी भाषा, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे आदी विषयांबरोबरच व्यावसायिक वैकल्पिक विषय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बेकरी उत्पादन, घरगुती विद्युत उपकरणे, स्क्रीन प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, संगीत, जलव्यवस्थापन, पाककला, उद्यान विद्या, चित्रकला, संगणक देखभाल व दुरूस्ती, शेतीपूरक व्यवसाय आदी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.वंचित घटकातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी हा उद्देश शासनाने मुक्त विद्यालय मंडळ सुरू करताना मांडला आहे. मात्र, ५ वी, ८ वी आदी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या वंचित घटकातील मुले शाळेतच गेली नाहीत तर त्यांना शिकविण्याची तसेच मार्गदर्शनाची सोय कशी उपलब्ध होईल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार ८ वी पर्यंतचे शिक्षण शासनाने उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मुले शाळेत आली नाही तर त्यांचे योग्य प्रकारे सामाजिकरण कसे पार पडेल, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.राज्य मुक्त विद्यालय मंडळावतीने ५ वी, ८ वी, १० वी व १२ वीची परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता ५ वीसाठी विद्यार्थ्याचे वय १० वर्षे पूर्ण असावे. इयत्ता ८ वीसाठी वय १३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक. इयत्ता १० वीसाठी वय १५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक त्याचबरोबर त्याने इयत्ता ५ वी उत्तीर्ण केली असणे आवश्यक असेल. तर इयत्ता १२ वीसाठी वय १७ वर्षे पूर्ण असणे आवश्यक त्याचबरोबर इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक असणार आहे.त्या मुलांसाठीचांगला पर्यायज्या मुलांना विशिष्ट कलेत, खेळात, व्यावसायिक शिक्षणात चांगले प्रावीण्य मिळवायचे आहे. त्यांना घरी किंवा त्यांच्या गुरूंकडे मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी मुक्त शिक्षण मंडळामुळे चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल. मात्र, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध असावीच लागेल.- वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ