शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार महिलांमागे फक्त एकच स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:33 IST

राष्ट्रीय निकष : ४० ते ५० व्यक्तींमागे एक शौचालय असावे

- माऊली शिंदेकल्याणीनगर : नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय अतंर्गत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, म.हौ. बोर्ड, कल्याणीनगर, लोहगाव या भागातील जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त महिलांची लोखसंख्या आहे. या महिलांसाठी फक्त सातच स्वच्छतागृहे क्षेत्रीय कार्यालयाने बांधली आहेत. जवळपास वीस हजार महिलांमागे एक स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.महिलांसांठी स्वच्छतागृहांच्या बाबतीत धोरण आखावे अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. गर्दीच्या ठिकाणी शंभर महिलांमागे एक स्वच्छतागृह असावे. तसेच ४० ते ५० व्यक्तींमागे एक शौचालय असावे असा राष्ट्रीय निकष आहे. मात्र, पालिकेने उच्च न्यायालयाची सूचना आणि स्वच्छतागृहा बाबत असलेले राष्ट्रीय निकष या दोन्ही गोष्टी कडे दुलर्क्ष केले आहे. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाअतंर्गत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, गांधीनगर, कल्याणीनगर, संजय पार्क आणि लोहगाव हा परिसर येतो. या परिसाची लोखसंख्या जवळपास साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे. या भागातील महिलांची लोकसंख्या दीड लाखापेक्षा जास्त आहे. तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी पार्क, कॉल सेंटर, शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि खासगी कार्यालय आहे. या ठिकाणी कामासाठी अनेक महिला येतात. या कामाला येणाऱ्या महिला सार्वजनिक आणि खासगी वाहनाचा वापर करतात. या महिलांसाठी या भागात स्वच्छतागृह नाही. जी स्वच्छतागृह आहेत ती वर्दळीपासून दूर आहेत. स्वच्छतागृहामध्ये पाणी नसणे, अस्वच्छता आदी समस्या आहेत.सहा. आयुक्तांना महिलांच्या समस्यांचे गांभीर्य नाहीनगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने आतापर्यंत महिला स्वच्छतागृहासाठी किती निधी खर्च केला. महिला स्वच्छतागृह का बांधले जात नाही आदी प्रश्नाच्या उत्तरांसाठी नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यलयाचे सहा. आयुक्त राजेश बनकर यांना फोन केला होती. मात्र, त्यांनी फोन घेऊन लगेच बंद केला. क्षेत्रीय कार्यालयांर्तगत कोणतीही माहिती सहा. आयुक्तांना विचारल्यावर, मी नवीन आहे असेच ते सांगतात. सहा. आयुक्त नागरिकांचे फोन घेत नाहीत. फक्त राजकीय प्रतिनिधींचा फोन घेतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाममहिला स्वच्छतागृह नसल्याने लघवीला जास्त जावे लागू नये म्हणून अनेक महिला कमी पाणी पितात. लघवी रोखून धरतात. सतत लघवी रोखून धरल्याने स्नायूंवर आणि किडनीवर ताण पडतो. बृद्धकोष्ठ, मुतखडा, रक्ताभिसरण आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अस्वच्छ स्वच्छतागृहाचा वापर केल्यामुळे जंतुसंसर्ग होतो.