शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ चार महिला रिंगणात

By admin | Updated: October 8, 2014 05:39 IST

मावळ विधानसभा मतदार संघात यंदा नऊ उमेदवार रिंगणात आहेत. सहा राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, यामध्ये एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही

पुणे : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी अग्र्रेसर व्हावे, अशी भूमिका सर्वच राजकीय मांडत असतात. मात्र, मोठ्या निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्यास राजकीय पक्षच उदासीन असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. युती व आघाडी तुटल्यानंतर महिलांनाही चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातील १0 मतदारसंघांत केवळ चार महिलांना प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली आहे. निवडणुका आल्या की सर्वच पक्ष महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्यावर बोलतात. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्र्रेसर असाव्यात, राजकारणात येवून महिलांनीही नेतृत्व करावे, अशी मते व्यक्त केली जातात. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी असे घडत नाही. उमेदवारी देताना राजकीय पक्ष महिलांना डावलतात. पुरुषांना उमेदवारी देण्यास अधिक प्राधान्य असते. अशावेळी महिलांच्या सक्षमतेचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांचे खरी भुमिका स्पष्ट होते. त्यातच ग्रामीण भागातील मतदार संघात महिला उमेदवार क्वचितच असतात. आंबेगाव मतदारसंघात काँग्रसेने संध्या बाणखेले, जुन्नरमधून शिवसेनेने आशा बुचके, खेड- आळंदीतून काँग्रेसने वंदना सातपुते, पुरंदरमधून भाजपने संगीताराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने २ , शिवसेनेन १ व भाजपने १ महिला उमेदवार दिला आहे. मात्र, जिल्हा ज्यांचा बालकिल्ला समजला जातो त्या राष्ट्रवादीने एकही महिला उमेदवार दिला नाही.मावळ विधानसभा मतदार संघात यंदा नऊ उमेदवार रिंगणात आहेत. सहा राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, यामध्ये एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही. पक्षाकडे रितसर उमेदवारी मागूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे एकही महिला उमेदवार मावळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. पिंपरी, चिंचवड, भोसरीतून १0 महिला उमेदवारपिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून केवळ पाच महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पाच महिला अपक्ष निवडणूक लढवित आहेत. अवघ्या १० महिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात केवळ एकाच राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली आहे. तर एक महिला अपक्ष निवडणूक लढवित आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात मोठ्या राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिलेली नाही. एका पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह एक अपक्ष महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. तीन राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. तर तीन महिला अपक्ष निवडणूक लढवित आहेत. (प्रतिनिधी)