शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

एकुलत्या मुलाचे केले नेत्रदान

By admin | Updated: June 10, 2017 02:10 IST

मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला. प्रथम श्रेणीत ६६ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. या स्वप्नपूर्तीची

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला. प्रथम श्रेणीत ६६ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. या स्वप्नपूर्तीची बातमी त्याने सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना फोन करून दिली. आनंदाला पारावर उरला नव्हता. मोठा इंजिनिअर होऊन आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची त्याच्यात जिद्द होती. त्याच आनंदात घरी निघाला; पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रस्त्यावर झालेल्याएका अपघातात काळाने त्याची व त्याच्या कुटुंबीयांची सगळी स्वप्ने हिरावून घेतली. चिंचवड येथील प्रणव (वय २०) हा नीळकंठ ऊर्फ उद्धव गावडे यांचा एकुलता होता़ तो पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. गुरुवारी त्याचा निकाल होता़ प्रथम श्रेणीत पास झाल्याची बातमी घरच्यांना फ ोनवर सांगून त्या आनंदातच तो घरी निघाला़ मात्र, रावेत येथे दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात प्रणव गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या अचानक जाण्याने गावडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीतही सामाजिक भान ठेवत आपल्या पोटच्या एकुलत्या मुलाचे नेत्रदान करण्याचा निर्णय गावडे कुटुंबीयांनी घेतला आणि समाजापुढे एक आगळावेगळा आदर्शच ठेवला. प्रणव अतिशय मनमिळाऊ आणि सर्वांचाच लाडका होता़ त्याच्या मृत्यूची बातमी कळताच उद्धव गावडे यांचे भाचे अमित लांडगे यांनी जागृती सोशल फाउंडेशनच्या राम फु गे यांच्याशी संपर्क साधला. मुलाचे नेत्रदान करण्यासाठी गावडे कुटुंबीय तयार होतील का? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. गावडे कुटुंबीयांचे नातेवाईक डॉ. प्रशांत खैरे यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि उद्धव गावडे यांनी नेत्रदान करण्यास संमती दर्शवली.