शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कांदा शेतकऱ्यांना रडविणार

By admin | Updated: October 10, 2014 06:24 IST

दिवाळीत कांद्याला ‘अच्छे दिन येतील’ या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला

सोमेश्वरनगर : दिवाळीत कांद्याला ‘अच्छे दिन येतील’ या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला. मात्र, दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीही कांद्याचे दर वाढत नसल्याचे चित्र आहे. बाजारात कांद्याला उठाव नसल्याने, ऐन सणासुदीला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. लोणंद (ता. खंडाळा) येथे आज सहा हजार पिशव्यांची आवक झाली होती. प्रतवारीनुसार कांद्याला सध्या ६०० रुपयांपासून १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी हा दर ९०० ते १००० रुपये मिळाला. त्यातच पावसामुळे बराच खराब कांदा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा दर खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दर वर्षी ३१ आॅगस्टपर्यंत संपणारा साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून नवीन कांद्याची आवकही वाढणार आहे. मात्र, आवक एवढ्या प्रमाणावर नाही. तरीही कांद्याचे भाव वाढत नाहीत. केंद्र सरकारने एकीकडे कांद्याच्या निर्यात मूल्यात वाढ केली, तर दुसरीकडे कांदा आयातीवरील निर्बंध आणखी कमी करून आयातही केली. त्यामुळे कांद्याच्या देशांतर्गत बाजारभावाला लगाम घालता गेला. कांद्याचे सध्याचे दर पाहता, ग्राहक सुखावला आहे. मात्र, कांद्याचे घसरलेले भाव उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत नवीन कांद्याची आवक वाढल्यास, भाव अजूनही कमी होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जुलैमध्ये महागाई आटोक्यात आणण्यासाठी कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा आली. कांद्याची साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्यावर अटकाव बसला. याशिवाय कांद्याचे मूल्य ३०० डॉलरवरून ५०० डॉलर केले. यामुळे कांद्याचे भाव २५०० हजार रुपयांच्या आसपास राहिले. मात्र, मध्यंतरी कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे सरकारने कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव पुन्हा खाली आले. (वार्ताहर)