शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

कांद्याची आवक घटली; भावात मात्र वाढ

By admin | Updated: December 22, 2014 05:29 IST

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊन भावात मोठी वाढ झाली, तर बटाट्याच्या आवकेत मोठी

चाकण : चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊन भावात मोठी वाढ झाली, तर बटाट्याच्या आवकेत मोठी वाढ होऊन भाव मात्र स्थिरच राहिले. कांद्याला या आठवड्यात प्रतवारी नुसार १५०० ते २२०० रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाट्याला आठवड्यात १७०० ते २१०० रुपये असा प्रतीक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला. येथील तरकारी विभागात पालेभाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक वाढूनही भावात वाढ झाली. राजस्थानमधील जोधपुर येथून १५ टन गाजर, मध्य प्रदेशातील जबलपूर येथून ४० टन वाटाणा व आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून १२ टन हिरव्या मिरचीची आवक झाली. चाकण बाजाराची एकूण उलाढाल २ कोटी ४८ लाख रुपये झाली.कांद्याची एकूण आवक ८०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १३५ क्विंटलने घटली. तळेगाव बटाट्याची आवक १००५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४८९ क्विंटलने वाढून बटाट्याचा भाव मागील आठवड्याच्या २१०० रुपयांवरच स्थिरावला. जळगाव भुईमुग शेंगांची आवक ३० क्विंटल झाली व भाव ५००० रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमुग शेंगांची आवक २० क्विंटल होऊन ६५०० रुपयांचा कमाल भाव मिळाला. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीने पालेभाज्यांच्या भावात किंचित वाढ झाली.खेड कृषी बाजार समितीच्या राजगुरूनगर येथील आवारात या आठवड्यात २ लाख ८० हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर २ लाख १० हजार जुड्या कोथिंबीरीची आवक झाली. तसेच २५ हजार जुड्या शेपूची आवक झाली. बाजार समितीच्या शेलपिंपळगाव आवारात मेथी, कोथिबीर व शेपूची अनुक्रमाने १९ हजार जुड्या २० हजार जुड्या व ५ हजार जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ५६० क्विंटल व मिरचीला २०० ते २३० रुपये असा प्रतीदहा किलोंसाठी भाव मिळाला. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभावकांदा - एकूण आवक : ८०० क्विंटल. भाव क्रमांक १. २२०० रुपये, भाव क्रमांक २. १८०० रुपये, भाव क्रमांक ३. १५०० रुपये.बटाटा - एकूण आवक १००५ क्विंटल. भाव क्रमांक १. २१०० रुपये, भाव क्रमांक २. १६०० रुपये, भाव क्रमांक ३. ११७०० रुपये.पालेभाज्या :चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव : मेथी-एकूण ६ हजार जुड्या (३०० ते ७०० रुपये), कोथिंबीर- एकूण ९ हजार जुड्या (२०० ते ३०० रुपये), शेपू - २ हजार जुड्या (४०० ते ६०० रुपये), पालक - एकूण ३ हजार जुड्या (३०१ ते ५०० रुपये).जनावरेचाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४० जर्शी गायींपैकी २० गायींची विक्री झाली. (१५,००० ते ५०,००० रुपये), ३५० बैलांपैकी २०० बैलांची विक्री झाली. (१५,००० ते ३०,०००), ५० म्हशींपैकी ३० म्हशींची विक्री झाली. (२०,००० ते ५०,००० रुपये) शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५ हजार २०० शेळ्या मेंढ्या पैकी ४ हजार ९०० शेळ्या मेढ्यांची विक्री होऊन १ हजार ते ५ हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात १ कोटी ५० लाख रुपयांची, तर एकूण बाजारात २ कोटी ४८ लाख रुपयांची उलाढाल झाली.