शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट टोल वसुलीप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील टोल नाक्यावर कब्जा करीत, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये बदल करून प्रवाशांना बनावट टोल पावती देत फसवणूक केल्याप्रकरणी ...

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील टोल नाक्यावर कब्जा करीत, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये बदल करून प्रवाशांना बनावट टोल पावती देत फसवणूक केल्याप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

विकास दिनकर शिंदे (रा. सोनगीरवाडी, ता.वाई, जि.सातारा) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षाच्या वतीने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील अगरवाल यांनी विरोध केला. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. पुरवार यांनी ती मान्य केली.

विकास याचे खेड शिवापूर टोल नाका येथील मॅनेजमेंट स्टाफ मध्ये नाव असून, त्याने पीएसटीआरपीएल यांचा आनेवाडी येथील टोल नाक्यावर कब्जा करत, राजकीय दबाव आणून तेथे टोल वसुली चालू ठेवली. लेन नं. १ व १६ वरील सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनमध्ये फक्त बदलच केला नाही, तर तेथील सीस्टिमला नवीन प्रिंटर जोडून त्याआधारे खोट्या पावत्या तयार करून प्रवाशांना दिल्या. याद्वारे आरोपींनी १३० रुपयांची पावती देऊन ४६ हजार वाहने सोडल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. याद्वारे त्यांनी कंपनीची ५९ लाख ८० हजारांची फसवणूक केली असल्याने शिंदे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.