शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणाहून अपहरण केलं होतं तिथेच आणून सोडलं पुन्हा ते एक वर्षांचं बाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 19:54 IST

हडपसर येथील गाडीतळ पुलाखालून आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केले होते.

हडपसर : हडपसर येथील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केल्यानंतर आज पहाटे तो चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत परत आला. परत  सोडणाऱ्या त्या 3 आरोपीना पोलिसांनी अटक  केली आहे 

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शर्मिला निलेश  काळे या महिलेने  फिर्याद दिली होती. तिचा मुलगा  कार्तिक (वय  1वर्ष ) याला पळवून नेले. त्यानुसार दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुल होत नसल्याने मुल पळवून आणण्याचे ठरवून मुल नेले . मात्र पोलीस  मागावर असल्याने भीती पोटी  ते मुल आज सकाळी आई जवळ  सोडून दिले .

या प्रकरणी पंचशीला तिपण्णा मेलिंकेरी (वय 33), वैशाली तुळशीराम सोनकांबळे (वय 41),केरनाथ नागनाथ सूर्यवंशी (वय 33) सर्व रा.चौफुला ता .दौंड , मुळगाव शिरपूर  ता .बसवकल्याण जि. बिदर कर्नाटक  यांना अटक केली आहे .

पतीसोबत वाद झाल्यामुळे फिर्यादी शर्मिला नीलेश काळे या हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती. ती रविवारी रात्री येथे आली होती. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना दोन महिला चालत त्या ठिकाणी आल्या. त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेल्या.पंचशीलाला मुल होत नसल्याने बहीण वैशाली व भावजी केरनाथ यांचे सोबत चर्चा करून मुल पळवून आणण्याचे ठरवले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली .

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला होता. अपहरणाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. पोलीस शोध घेत असताना आज पहाटे अज्ञातांनी त्या चिमुकल्याला पुन्हा या ठिकाणी आणून सोडले  होते.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरKidnappingअपहरण