शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

वाळूतस्करांकडून एकाला मारहाण

By admin | Updated: December 8, 2015 00:09 IST

ओढ्यामधील वाळू काढत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिल्याने कारवाई झाल्याचा राग मनात धरून वाळूतस्करांनी एकाला बेदम मारहाण केल्याने तो

यवत : ओढ्यामधील वाळू काढत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिल्याने कारवाई झाल्याचा राग मनात धरून वाळूतस्करांनी एकाला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. ६) चौफुला (ता. दौड) येथे घडली.मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली धनाजी गवळी (वय ३२, रा. गवळीमळा, हातवळण, ता. दौड) असे असून याबाबतची फिर्याद त्यांचा भाऊ भरत गवळी यांनी यवत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बेकायदा जमाव जमवून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा आरोपी सतीश टेंगले (रा. दापोडी, ता. दौंड), धनंजय टेंगले, प्रकाश टेंगले, विजय दिवेकर (तिघेही रा. वरवंड, ता. दौंड), अनिल धावड़े (रा. कडेठाण, ता. दौंड) व इतर दोघांनी यांच्याविरोधात दाखल केला आहे.याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, माऊली धनाजी गवळी यांच्या हातवळण गावच्या हद्दीत असलेल्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या ओढ्यामधून वरील आरोपी वाळूउपसा करीत होते. मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर दौंड तहसीलदार यांनी कारवाई केली होती. ती वाळू काढत असल्याची माहिती गवळी यांनी तहसीलदार यांना दिल्याचा समज करून घेतला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी माऊली गवळी गाडी धुण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये गेले असता त्यांना बोलावून घेत आमची माहिती दिल्याने ७ लाखांचे नुकसान झाले. वाहने उभी राहिली. आता तुला सोडणार नाही, असे म्हणत लोखंडी पाइप व टॉमी यांनी जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत गवळी यांना यवतमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून ससून हॉस्पिटल पुणे येथेदेखील हलविण्यात आले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)