पिंपरी : गांधीनगरजवळ लोखंडे कामगार भवनसमोर दोघांनी एका तरुणाच्या तोंडावर काचेच्या बाटलीने वार केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवा प्रल्हाद कांबळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा कांबळे आणि त्याचा मित्र सुरेश बोचकुरे हे दोघे काल रात्रीच्या सुमारास पिंपरीतील कामगार भवनासमोर गप्पा मारत उभे होते. त्या वेळी आरोपींनी शिवाच्या तोंडावर आणि डोक्यावर काचेच्या बाटलीने वार केले. यामध्ये शिवा जखमी झाला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ ऊर्फ विकास कांबळे (वय २७) आणि सेलमन गायकवाड (वय २१, दोघेही रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. (वार्ताहर)
गांधीनगरजवळ एकावर वार
By admin | Updated: February 18, 2017 02:51 IST