शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा विहारासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू; एक जण वाहून गेला, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 23:11 IST

सकाळी १०.३० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले.

तळेगाव दाभाडे- वर्षा विहारासाठी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या चार महाविद्यालयीन युवकांपैकी दोघेजण वाहून गेले. तर दोघेजण बचावले. एका युवकाचा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासन ,वन्यजीव रक्षक मावळ,शिवदुर्गमित्र लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

अनिकेत वर्मा (वय १७) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अशोक गुलाब चव्हाण (वय१७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवार(दि.२४) रोजी सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेज मधील ८ते ९मित्र वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा येथे आले होते. हे सर्व जण कॉलेजला दांडी मारून लोकलने बेगडेवाडी येथे उतरले. त्यानंतर त्यांनी सर्वांनी पायी कुंडमळा गाठला.त्यातील चौघे पाण्यात उतरले. त्यातील दोघे जण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेले.

सकाळी १०.३० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले. अशोक गुलाब चव्हाण (वय१७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व त्यांचे सहकारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, शिवदुर्ग मित्रचे सचिन सुनील गायकवाड,भास्कर माळीमामा,गणेश ढोरे, गणेश निसाळ, विनय सावंत, गणेश गायकवाड, विकी दौडकर, अविनाश कार्ले, शुभम काकडे, निनाद काकडे, वैभव वाघ, सागर कुंभार , रतन सिंग, योगेश दळवी , सिध्देश निसाळ महेश मसणे, राजेंद्र कडू, प्रशांत शेडे, सागर भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषचे निरंजन भेगडे, रियाज मुलाणी, गणेश जावळेकर , शुभम काळोखे , धीरज शिंदे, अक्षय घोडेकर यांनी अथक प्रयत्न केले.

अंधार पडल्याने रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता पुन्हा ही शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व नीलेश गराडे यांनी सांगितले. (कोट) कुंडमळा येथील रांजणखेळगे पाहताना पाण्यात उतरू नये. पाण्याचा प्रवाह प्रचंड असून अनेक ठिकाणी निसरडे झाले आहे. त्यामुळे पाय घसरून अपघात होऊ शकतो. आपला जीव महत्त्वाचा आहे. वर्षा विहाराचा आनंद लुटताना नियमांचे पालन करावे. - निलेश गराडे संस्थापक: वन्यजीव रक्षक मावळ