शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक भाषा, एक धर्म’ अराजक निर्माण करेल - फादर दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 03:18 IST

साहित्य परिषदेतर्फे सत्कार; सीमेवरील शत्रूपेक्षा घरातील शत्रूंची चिंता जास्त

पुणे : ‘ज्या देशात लोक एकमेकांचा द्वेष करतात, त्या देशाला भवितव्य नसते. सीमेवरील शत्रूपेक्षा मला घरातील शत्रूंची जास्त चिंता वाटते. मते न पटणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मात्र, विरोधाच्या नावाखाली होणारी झुंडशाही आपल्याला मान्य आहे का,’ असा सवाल उपस्थित करत ‘हुकूमशहाचा उदय होतो, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येतात. एक भाषा, एक धर्म देशात अराजक निर्माण करेल,’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी खडे बोल सुनावले.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फादर दिब्रिटो यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. या वेळी कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे उपस्थित होते. पं. वसंतराव गाडगीळ यांनी दिब्रिटो यांना संस्कृतमधून शुभेच्छा दिल्या. दिब्रिटो यांच्या निवडीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मसाप परिसरात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. माधवराव पटवर्धन सभागृहात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येकाची तपासणी केली जात होती. दिब्रिटो म्हणाले, ‘आपण एकमेकांचे धर्म साहित्य वाचत नाही, केवळ दोष दाखवतो. धर्मात परिवर्तन घडत आहे, मानवता रुजत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मिशनरी म्हणजे धर्मांतर असा गैरसमज पसरवला जात आहे. सक्तीने धर्मांतराला चर्चचा विरोधच आहे. संविधानाच्या चौकटीत राहून हवा तो धर्म स्वीकारण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोणताही धर्म नाही तर भारत टिकला पाहिजे. माणूस हा चिंतनाचा विषय करू या.’देशाची संस्कृती बहुमुखी आहे. विरोध करणारे संस्कृतीची चेष्टा करत आहेत. ज्याला वर्तमानाचे यथार्थ आकलन होते, तोच भूमिका घेऊ शकतो. धर्माने आणि धर्मसंस्थांनी मानवतेला कायम तुरुंगात डांबले. धर्म जितकी माणसे मारतो तितकी आजवर कोणीही मारलेली नाहीत. - डॉ. रावसाहेब कसबे