पुणे : टेम्पोत माल भरत असताना अचानक टेम्पो मागे असल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला.कालीदास रामराव उपासे (वय ३७, रा़ वाडवना, ता़ उदगीर, जि़. लातूर) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३, रा़ डोंगरी चाळ, फुगेवाडी) याला अटक केली आहे. ही घटना नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर २० फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता घडली.याप्रकरणी अरणेश्वर पुंडे (वय२८, रा़ ता उदगीर, जि़ लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. पुंडे व त्यांचे मामा कालीदास उपासे हे त्यांच्या कंटेनर ट्रकमधील माल हॅप्पी सिंग यांच्या टेम्पोमध्ये भरत होते़ सिंग यांनी टेम्पोचा हँड ब्रेक न लावता ते टेम्पोतून खाली उतरले़ त्यामुळे उतारावर टेम्पो मागे गेला. त्यावेळी कालीदास हे टेम्पोमध्ये माल भरत होते़ टेम्पो मागे आल्याने त्याखाली सापडून त्यात त्यांचा मृत्यू झाला़ सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
टेम्पोच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू; सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:19 IST
टेम्पोत माल भरत असताना अचानक टेम्पो मागे असल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३) यांना अटक केली आहे.
टेम्पोच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू; सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल
ठळक मुद्देनवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर २० फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता घडली घटनासिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३) याला केली अटक