शिक्रापूर : स्वाइन फ्लूचा ताप दिवसेंदिवस वाढत असून, शिक्रापूर येथील एकाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुनील मारुती दिघे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. दिघे यांना अचानक ताप, सर्दी जाणवू लागली. अशक्तपणा आल्याने त्यांनी येथील खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतले. परंतु यामध्ये काहीही फरक न जाणवल्याने त्यांनी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना टॅमीफ्लू झाला असल्याचे आढळले. यानंतर त्यावर उपचारदेखील करण्यात आले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा खासगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासण्या केल्या असता, तातडीच्या उपचारासाठी ससून येथे हलविण्यात आले. या ठिकाणी गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू
By admin | Updated: March 25, 2017 03:28 IST