शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट येथील अपघातात पुण्यातील एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 20:42 IST

म्हापसा, दि. ३ - सुप्रसिद्ध अशा कळंगुट येथील भागात गुरुवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र अपघातात जखमी झाला. विमल नगर पुणे येथील रहिवाशी पूर्वेश शहा (३७) हा आपला मित्र लोकनाथ प्रसाद  (पुणे) याच्यासोबत गाडी होंडा अ‍ॅक्वॉर्ड क्र. एमएच ०२ बीएम ...

म्हापसा, दि. ३ - सुप्रसिद्ध अशा कळंगुट येथील भागात गुरुवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र अपघातात जखमी झाला. विमल नगर पुणे येथील रहिवाशी पूर्वेश शहा (३७) हा आपला मित्र लोकनाथ प्रसाद  (पुणे) याच्यासोबत गाडी होंडा अ‍ॅक्वॉर्ड क्र. एमएच ०२ बीएम २२०९ घेऊन कळंगुटच्या दिशेने जात होता. बेदरकारपणे सुसाट गाडी चालवणाऱ्या पूर्वेश शहा याचा आपल्या वाहनावरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर त्याची जोरदार टक्कर बसली व गाडी बाजूला कोलमडली. त्याच्या शेजारी बसलेल्या लोकनाथ प्रसाद यांनी कळंगुट पोलिसांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल  होऊन दोघानांही वाहनातून बाहेर काढले व जवळच असलेल्या कांदोळी येथील आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले. तेथे पूर्वेश शहा याला मृत घोषीत करण्यात आले. यावेळी केंद्रावर लोकनाथ प्रसाद याची मद्यार्क चाचणी घेण्यात आली. त्यावेळी तो दारूच्या नशेत  असल्याचे आढळून आले. पूर्वेश शहा याच्या मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात आली असून त्याचा अहवाल राखून ठेवण्यात आल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली आहे. त्याचा मृतदेह नंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार झाडावर ठोकर मारण्यापूर्वी सदर वाहनाने एका पादचाºयाला सुद्धा ठोकर मारुन जखमी केले होते. जखमी पादचाऱ्यावर नंतर प्राथमिक उपचार करुन त्याला घरी पाठवण्यात आले. सदर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीष पाडलोस्कर पुढील चौकशी करीत आहेत.