भिगवण : भिगवण रोटरी क्लबने राबविलेल्या एक मूठ धान्य वंचितासाठी या उपक्रमास दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक भुकेल्या जीवाला आधार मिळणार आहे. या उपक्रमाध्ये २० शाळांतील मुलांनी ५५ पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले तर येथील सचिन फॅन क्लबनेही या उपक्रमास सहभाग घेत २५ हजार रुपयांचे धान्य जमा केले. जमा झालेले धान्य परिसरातील सहा वृद्धाश्रम, अनाथ व मतिमंद विद्यालयांना वितरीत करण्यात आले. रोटरीच्या या उपक्रमांमुळे वंचितांना मदत मिळण्याबरोबरच मुलांमधील संवेदना जागृत होण्यास देखील हा उपक्रम प्रयोगशील असल्याने यातुन चांगले संस्कार रुजवले जात असल्याने शाळा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत असल्याचे दिसते. अन्नाविना वंचित असणाऱ्यांना मदत व्हावी, या हेतुने एक मूठ वंचितासाठी ही अभिनव कल्पना रोटरी क्लबने राबविली. यामध्ये विठ्ठलराव थोरात इंग्लिश स्कूल भिगवण, भैरवनाथ विद्यालय भिगवण, आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण, जिल्हा प्राथमिक शाळा तक्रारवाडी, डिकसळ व पोंधवडी आदी २० शाळातील मुलांनी ५५ पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले. जमा झालेल्या धान्य गरजू संस्थांपर्यंत पोचविण्याचा कायर्क्रम नुकताच झाला. भिगवण रोटरी क्लबचे संस्थापक-अध्यक्ष सचिन बोगावत, अध्यक्ष नामदेव कुदळे, रियाज शेख, संजय चौधरी, संपत बंडगर, डॉ. जयप्रकाश खरड, डॉ. भारत भरणे व सचिन फॅन क्लबचे संदीप वाकसे, प्रसाद क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी, ज्ञानप्रबोधिनी मतिमंद विद्यालय कोर्टी, अविश्री बालसदन दौंड, यशोधरा संस्था बारडगाव, निवासी मतिमंद विद्यालय वागज, समर्थ मूकबधिर विद्यालय, इंदापूर या संस्थाना जमा झालेल्या धान्याचे वाटप करण्यात आले.
‘एक मूठ धान्य वंचितांसाठी’ उपक्रम, २० शाळांमधून ५५ पोती धान्य जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:42 IST
अन्नाविना वंचित असणाऱ्यांना मदत व्हावी, या हेतुने एक मूठ वंचितासाठी ही अभिनव कल्पना रोटरी क्लबने राबविली.
‘एक मूठ धान्य वंचितांसाठी’ उपक्रम, २० शाळांमधून ५५ पोती धान्य जमा
ठळक मुद्देया उपक्रमाध्ये २० शाळांतील मुलांचा सहभाग