शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

जिल्हा परिषदेची एक कोटीची चिक्की निकृष्ट

By admin | Updated: May 27, 2016 05:00 IST

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा गाजत असताना पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाची चिक्की

पुणे : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा गाजत असताना पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाची चिक्की खरेदी केल्याचे समोर आले आहे. या चिक्कीला तेलाचा उग्र वास येत असून, लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडीच्या मुलांच्या पोषण आहारासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची चिक्की विनानिविदा शासनाच्या दरपत्रकानुसार खरेदी केली. या चिक्कीचा दर्जा निकृष्ट असल्याने पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळ्याची राज्यभर चर्चा झाली. असे असताना पुणे जिल्हा परिषदेने सुमारे एक कोटी रुपयांची चिक्की खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या नियमानुसार दरपत्रकात चिक्कीचा उल्लेख असल्याने या दरकरारानुसार चिक्की खरेदी करावी लागते. त्यानुसार शासनाच्या दरपत्रकानुसार एक कोटी रुपयांची चिक्की खरेदी करण्यास तांत्रिक मान्यता घेण्यासाठी जिल्हा परिषदेने महिला व बालकल्याण आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला होता. पण चिक्की घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण आयुक्तांनी मान्यता दिली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने काळी खजूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. याला वेळेवर मान्यता न मिळाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी तत्कालीन महिला व बालकल्याण आयुक्त राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन चिक्कीच खरेदी करण्यासाठी मान्यता देण्याची विनंती केली. दर्जेदार चिक्की खरेदी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे अखेर आयुक्त कार्यालयाकडून चिक्की खरेदी करण्याची मान्यता दिली. महिला व बालकल्याण आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेने हवेली तालुक्यातील उरुळीकांचन येथील ठाकूर फुड प्रॉडक्टस् यांना १ कोटींच्या चिक्कीची आॅर्डर दिली. आयएसओ दर्जाच्या या चिक्कीला तेलाचा वास येत आहे. पाकिटावर उत्पादनाची तारीख अस्पष्ट आहे. चिक्की खाल्यानंतर घशामध्ये खवखव होत असल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये चिक्की पडून आहे. वेल्हा तालुक्यातील एका पालकांनी जि.प.च्या चिक्कीचे पाकिट ‘लोकमत’मध्ये आणून दिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. मी स्वत: आग्रह धरून पुणे जिल्ह्यात चिक्की खरेदी केली आहे. ही खरेदी करत असताना दर्जामध्ये कोठेही तडजोड केली नाही. त्यानंतरदेखील काही तक्रारी आल्या असतील, तर महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. -प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष