शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक कोटीच्या गाड्या, भागधारकांना मात्र दोन वर्षांपासून लाभांश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:56 IST

गेल्या दोन वर्षांत भागधारकांना लाभांश देऊ न शकलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रने वरिष्ठ अधिका-यांसाठी गेल्या वर्षात १ कोटी रुपयांची वाहने खरेदी केली आहेत.

पुणे : गेल्या दोन वर्षांत भागधारकांना लाभांश देऊ न शकलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रने वरिष्ठ अधिका-यांसाठी गेल्या वर्षात १ कोटी रुपयांची वाहने खरेदी केली आहेत. अशा प्रकारच्या अनिर्बंध खर्चामुळे बँकेत गुंतवणूक करणा-यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीती बँकेचे भागधारक आणि सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली.डीएसके यांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेलणकर म्हणाले की, केवळ बँक आॅफ महाराष्ट्रच नाही, तर सर्वच राष्ट्रीयीकृत बँका अडचणीत आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केल्यामुळे समभागाच्या किमतीवर त्याचा विपरित परिणाम झाला. सध्या समभागाचा दर १२ रुपयांपर्यंत खाली आला असून, त्यात आणखी घटदेखील होऊ शकते. गेल्या दोन वर्षांपासून बँकेने भागधारकांना लाभांश दिलेला नाही. बचत खात्यात पैसे ठेवले, तरी वर्षाला ४ ते ५ टक्के परतावा मिळतो. लाभांश मिळणार नसेल तर भागभांडवलात गुंतवणूक केली जाईल का?काटकसर हवीखरेतर ही जबाबदारी बँकेतील वरिष्ठ अधिकाºयांची आहे. त्यांनी काटकसरीची भूमिका घेतली पाहिजे. मात्र, बँक आॅफ महाराष्ट्रच्या उच्चाधिकाºयांसाठी गरज नसताना १ कोटी रुपयांची वाहने खरेदी करण्यात आली. व्यवस्थापन पैशांचा योग्य विनियोग करीत असल्याचा संदेश गुंतवणुकदारांमध्ये गेला पाहिजे. बँक चांगल्या पद्धतीने चालविण्याबाबत व्यवस्थापन गंभीर असल्याचे कृतीतून दिसायला हवे, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.