शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खेड पंचायत समितीच्या सभापतीसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खेड पंचायत समितीच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करीत गोळीबार करणा-या सभापतीला त्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खेड पंचायत समितीच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करीत गोळीबार करणा-या सभापतीला त्याच्या एका साथीदारासह ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली, तर अन्य संशयित आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. अविश्वासाचा ठराव झाल्याने सभापतीने हे कृत्य केले.

सभापती भगवान नारायण पोखरकर व केशव अरगडे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद दशरथ काळे (रा. गोलेगाव, खेड) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून भगवान पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह 15 ते 20 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगून गोळीबार करणे, विनयभंग, अपहरण, हॉटेलमध्ये जबरदस्तीने घुसून तोडफोड करणे या स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला होता.

भगवान पोखरकर खेड पंचायत समितीचा विद्यमान सभापती आहे. सभापती पदाचा कार्यकाळ संपूनही अद्याप पदभार न सोडलेल्या पोखरकर याच्याविरुद्ध शिवसेना व मित्र पक्षांच्या सदस्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्याबाबतची सुनावणी ३१ मे रोजी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार व भारतीय जनता पक्षाचा एक असे अकरा सदस्य त्यांच्या परिवारासह २६ मे रोजी डोणजे परिसरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी भगवान पोखरकर व त्याच्या १५ ते २० साथीदारांनी गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. तर पोखरकरचा भाऊ जालिंदर पोखरकर याने पिस्तुलने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केली होती.

या घटनेनंतर व हवेली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून समांतर तपास सुरू होता. दरम्यान, सभापती भगवान पोखरकर व केशव अरगडे हे दोघेही शिवाजीनगर येथील मंगला चित्रपटगृहाजवळ येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक रामेश्‍वर धोंडगे, पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड, गुरू जाधव, अमोल शेडगे आदीच्या पथकाने मंगला चित्रपटगृहाजवळ सापळा रचून दोघांना अटक केली.

-----------