शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Dog Injured: चिऊच्या डोळ्यात दीडशे अळ्या; उपचारानंतर तिच्या मनी फुलल्या आनंदाच्या कळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:19 IST

चिऊ या दोन महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला डोळ्याला जखम झाली होती

श्रीकिशन काळे

पुणे : दोन महिन्यांची ‘चिऊ’ रस्त्यालगत होती आणि तिच्या डोळ्याला खूप जखम झालेली दिसली. हे कुत्र्याचं पिल्लू एका डाॅगप्रेमीने पाहिले आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. ‘चिऊ’च्या एका डोळ्यात दीडशे अळ्या निघाल्या. डोळा तर निकामी झाला; पण चिऊवर उपचार झाले. काही दिवसांनंतर तिला कोणी दत्तक घेईल का ? याविषयी हालचाली झाल्या; पण तिला एक डोळा नसल्याने कोणी दत्तक घेईल असं वाटत नव्हते; पण गगनबावडा येथील दाम्पत्याने चिऊला हक्काचे घर दिले. ती चिऊ आज त्यांच्या घरात, शेतात खूप आनंदाने बागडत आहे.

प्राणीप्रेमी ॲड. विंदा महाजन यांना ही चिऊ कोथरूडमधील परमहंस नगर परिसरात दोन महिन्यांची असताना दिसली. तिच्या डोळ्याला जखम झाल्याने तिला डॉक्टरकडे नेले. डॉ. तुळपुळे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा तिच्या डोळ्यात सुमारे दीडशे अळ्या निघाल्या. त्या अळ्यांनी संपूर्ण डोळाच खाल्ला होता. त्यामुळे तो निकामीच झाला. परंतु, चिऊचा दुसरा डोळा चांगला होता. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी नाईक मंदिर ॲनिमल ग्रुपच्या सदस्यांनी प्रयत्न केले. हळूहळू चिऊचे आरोग्य सुधारू लागले आणि ती एकदम फिट झाली; पण तिला एक डोळा निकामी झालेला असताना कोणी दत्तक घेईल, असं वाटत नव्हते. परंतु, कोल्हापूर येथील गगनबावडा येथे राहणारे देवदत्त नाईक आणि सुजाता ठोसर यांनी चिऊला दत्तक घेण्याचा निर्णय सांगितला. पद्मिनी खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाईक कुटुंबीयांकडे नेलेे. त्यानंतर आता चिऊ तिथं खूप छान रमली आहे. घरात, शेतात बागडत आहे. तिला एक डोळा नसल्याने काहीच अडचण आलेली नाही, असे ॲड. विंदा महाजन यांनी सांगितले. ॲनिमल ग्रुपच्या पद्मिनी खांडेकर, प्रीती मोक्तिक, लता गज्जर, रूता देसाई, मनीष जोशी, निखिल देशपांडे,  विंदा महाजन, साळुंखे मॅडम यांनी चिऊची देखभाल केली.  

''खरंतर असा श्वान कोणी घेत नाही; पण नाईक कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन तिला दत्तक घेतले. एक डोळा असलेल्या चिऊला तिचे हक्काचे घर मिळाले. यात खूप आनंद असून, तो चिऊच्या एका डोळ्यातूनही अनुभवायला मिळतोय. नवीन श्वान विकत घेण्यापेक्षा ज्या प्राण्यांना खरी गरज आहे, त्यांना दत्तक घ्यावे. आज ब्रिडिंगचे डॉग्स घेण्याच्या हट्टापायी एक महिन्यात पिलाला आईपासून वेगळे केले जाते. जबरदस्तीने ब्रिडिंग करवले जाते. हा प्रकार थांबवून गरज असलेल्या प्राण्यांवर माया दाखविली पाहिजे, असे ॲड. विंदा यांनी सांगितले.'' 

 

टॅग्स :dogकुत्राdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल