शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा ई-पासची तरतूद; पोलीस आयुक्त कार्यालयात डिजिटल कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणण्यात आले असून, इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आता ई-पास लागणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणण्यात आले असून, इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आता ई-पास लागणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात ई-पाससाठी डिजिटल कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध अधिक कडक केले असून, प्रवासावरदेखील कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. हे नियम १ मे पर्यंत लागू आहेत. या दरम्यान राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता ई-पास यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच पुणे शहरातून इतर जिल्ह्यात जाण्याकरिता ँ३३स्र२://ूङ्म५्र1ि9.ेँस्रङ्म’्रूी या संकेतस्थळावर ‘ई-पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालयात पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २०७७ इतके विनंती अर्ज ई-पाससाठी कक्षाकडे प्राप्त झाले असून. त्यापैकी २८६ नागरिकांना डिजिटल पास देण्यात आले आहेत. ३७५ नागरिकांची आवश्यक कागदपत्रे नसल्याने नाकारण्यात आले आहेत.

या डिजिटल कक्षामध्ये १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक आणि २० पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई-पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

जाणून घ्या कसा काढावा ई-पास

* ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम ँ३३स्र२://ूङ्म५्र1ि9.ेँस्रङ्म’्रूी या संकेतस्थळाला भेट द्या.

* ंस्रस्र’८ ाङ्म१ स्रं२२ ँी१ीह्ण या पयार्यावर क्लिक करा.

* ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.

* आवश्यक कागदपत्र जोडावीत.

* प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही तेथे नमूद करावे लागेल.

* कागदपत्रे अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.

* अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करावा, त्यावरून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचे स्टेटस तपासता येईल.

* पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरून इ- पास डाऊनलोड करू शकता.

*ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.

* प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत ठेवा. जेणेकरून पोलिसांनी विचारल्यानंतर पास दाखविता येऊ शकेल.

----------------------------------------------

कुणाला मिळू शकतो ई-पास

* अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.

-अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.

व्यावसायिक कारणांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.

विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास करण्याकरिता डिजिटल पास देण्यात येईल.

* ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अ‍ॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदत केली जाईल.