शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ओमप्रकाश गोयंका अटकेत, रॉयल ट्विंकल स्टार क्लब फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:30 IST

रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

पुणे : रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे़ त्यांना न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपनीने केलेल्या फसवणूकीत आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ३ हजार १३५ गुंतवणुकदारांनी ४१ कोटी ३ लाख २० हजार ९६८ रुपयांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी देण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय विश्वनाथ पटवर्धन यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स (वडाळा मुंबई) या कंपनीचे संचालक ओमप्रकाश वसंतलाल गोयंका (वय ६८, रा़ मुंबई) प्रकाश गणपत उत्तेकर (रा़ मुंबई), नटराजन व्यंकटरामन (अय्यर) ऊर्फ व्ही. नटराजन (रा़ वडाळा, मुंबई), एल. एस. कोटणीस (रा़ सायन पूर्व, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे १९ लाख २४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आली होती. त्याबरोबरच नाशिक येथील लासलगाव पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई व अहमदनगर येथेही गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडे आलेल्या ३ हजार १३५ जणांची ४१ कोटी ३ लाख २० हजार ९८६ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी व कंपनीचे संस्थापकीय संचालक ओमप्रकाश वसंतलाल गोयंका यांना नाशिक कारागृह येथून तपासासाठी अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाने १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर कंपनीकडून शहरातील फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा