शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जुन्याच योजना नव्या स्वरूपात

By admin | Updated: May 12, 2017 05:33 IST

महापालिकेतील सत्ताप्राप्तीनंतर प्रथमच सादर केलेल्या अंदाजपत्रकात भारतीय जनता पक्षाने जुन्याच योजनांचा आधार घेतल्याचे दिसते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेतील सत्ताप्राप्तीनंतर प्रथमच सादर केलेल्या अंदाजपत्रकात भारतीय जनता पक्षाने जुन्याच योजनांचा आधार घेतल्याचे दिसते आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या पक्षाचा नाव बदलण्याचा अजेंडाच अंदाजपत्रकात जोरदारपणे राबवला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी नगरसेवकांना जास्त व विरोधकांना तोंडी लावण्यापुरती तरतूद हा प्रकार याही अंदाजपत्रकात झाला आहे.महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची योजना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय अशा नावाने सन २००१मध्ये मांडण्यात आली होती. तीच योजना आता भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय अशा नावाने सादर करण्यात आली आहे. त्याशिवाय महापालिका शाळांचे संगणकीकरण, ई-लायब्ररी, शवागार, श्वानसंगोपन केंद्र अशा बऱ्याच योजना यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्याच आहेत. त्यांची नावे मात्र बदलण्यात आली आहेत. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा ही करदात्या नागरिकांसाठी मांडलेली योजनाही तशीच आहे. सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालयाची कल्पनाही जुनीच आहे. वारकरी भवन, हज हाऊस या योजनाही मागील अंदाजपत्रकावरून पुढे घेण्यात आल्या आहेत.एकूण ६८ योजना अंदाजपत्रकातील महत्त्वाच्या योजना म्हणून स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढे केल्या आहेत. त्यातील वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, शहराच्या पश्चिम भागासाठी नवे हॉस्पिटल अशा काही योजना काही कोटी रुपयांचा खर्च लागणाऱ्या आहेत. मात्र अंदाजपत्रकात त्यासाठीची तरतूद १० कोटी, ५ कोटी, ४ कोटी, अशी किरकोळ करण्यात आली आहे. महापालिकेत सर्वसाधारणपणे असा संकेत आहे, की एकूण खर्चाच्या किमान अर्धी तरी तरतूद अंदाजपत्रकात केली असेल तरच त्या कामांची निविदा काढावी. अंदाजपत्रकात दिलेल्या योजनांच्या खर्चासाठी किरकोळ तरतूद असल्याने त्या प्रत्यक्षात येणार का, अशी शंका व्यक्त होते आहे. सभासद यादीत आपण सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव केला नसल्याचे मोहोळ यांनी अंदाजपत्रकावरील भाषणात सांगितले. मात्र प्रत्यक्षात तरतूद करताना पक्ष पाहिला गेला असल्याचे दिसते आहे. सदस्यांनी दिलेल्या यादीतून सयादी अंदाजपत्रक तयार करण्यात येते. यामध्ये पदाधिकाऱ्यांसाठी महापौर वगळता २५ कोटी, खुद्द अध्यक्षांसाठी ३० कोटी, सर्वपक्षीय गटनेत्यांसाठी प्रत्येकी १० कोटी, सत्ताधारी सदस्यांसाठी ४ कोटी व विरोधी सदस्यांसाठी साधारण अडीच ते तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापौरांसाठी फक्त १० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.