शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे, कर्मचारी अधिका-यांची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:58 IST

मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच, सुविधांचा अभाव, कर्मचाºयांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

चाकण : मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच, सुविधांचा अभाव, कर्मचाºयांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.या कार्यालयात कुठलेही तातडीचे काम लवकर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून पुरेसे मनुष्यबळ भरून पोस्टाचा कारभार सुधारण्याची मागणी चाकण परिसरातील नागरिकांकडून होत आहे.औद्योगिक वसाहत, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्यावस्त्या व गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसह या भागातील सर्व बँका, पतसंस्था यांचा कारभार तसेच दैनंदिन टपाल, ठेव योजना, बचत योजना, विमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. नागरिकांना ताटकळत खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. कर्मचाºयांची कमतरता आहे. त्यामुळे कामास विलंब होतो, अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांचीखंत आहे.अडीच लाख वस्तीसाठी मोजके कर्मचारीशहराची व लगतच्या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत शहर झपाट्याने विस्तारले आहे; मात्र पोस्टमनची पदे जुन्याच मानकाप्रमाणे मंजूर आहेत.चाकण व लगतच्या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकवस्तीसाठी तीन अधिकारी व हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आठ-दहा कर्मचारी आहेत. कर्मचारी कमी असल्यामुळे नागरिकांना पत्र वेळेवर मिळत नाहीत.मोबाईलमुळे पोस्टाचा पत्रव्यवहार कमी झाला असला, तरी शासकीय पत्रे, कंपन्यांचे टपाल, फोन, मोबाईलची बिले, विमा संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे. या पत्रांच्या वितरणासाठी अपुरे पोस्टमन आहेत. त्यामुळे वितरणाच्या कामाचाही खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या