शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

धर्मादाय आयुक्त कार्यालय ‘हायटेक’

By admin | Updated: May 22, 2017 05:00 IST

धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांची माहिती एका ‘क्लिक’वर उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त कार्यालयातर्फे सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांची माहिती एका ‘क्लिक’वर उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त कार्यालयातर्फे सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. परिणामी न्यास नोंदणी, बदल अर्ज, लेखापरीक्षण अहवाल आदी विषयांची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरणे शक्य झाले आहे. आता या प्रक्रियेचा वापर कसा करावा, याबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाची माहिती पुणे विभागीय सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, श्यामकांत देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ मनोज वाडेकर आदी उपस्थित होते.पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण १ लाख ३३ हजार ७५८ संस्था येतात. त्यांतील बहुतांश संस्थांच्या कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले झाले असून, काही संस्थांची माहिती लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे नमूद करून कचरे म्हणाले, ‘‘पुढील काळात धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे सर्व कामे आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत. त्यामुळे नवीन संस्थेची नोंदणी केल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. तसेच बदल अर्ज, हिशेब पत्रके सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत. रुग्णालयांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यामुळे कोणत्या रुग्णालयात गरीब नागरिकांसाठी किती बेड रिक्त आहेत, हे समजू शकणार आहे.’’