शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

पदाधिकाऱ्यांचा कारभार एककल्ली!

By admin | Updated: September 25, 2015 01:25 IST

पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण, केवळ नावाला सुरू झालेले उपक्रम, आहे

पुणे : पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण, केवळ नावाला सुरू झालेले उपक्रम, आहे त्या शाखा कार्यरत करण्याऐवजी आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खिरापतीप्रमाणे शाखा वाटणे असे विविध आरोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा महिनाअखेरीस होत असून, त्या वेळी या आरोपांमुळे वादाला तोंड फुटून खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. साहित्य महामंडळाच्या कारभारीची मुदतही संपत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही वार्षिक सभा अखेरची ठरणार आहे. त्यामुळे ही सभा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. मतदारांनी पूर्ण बहुमताने एकहाती सत्ता दिली. एकजुटीवर कारभार चालेल, असे वाटत असताना अधूनमधून वादाचा ठिणग्या पडू लागल्या. आता तर अशी परिस्थिती आहे, की कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन एकीकडे आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे दुसरीकडे. परिषदेच्या सर्वच कारभारात अंतर्गत राजकारणाने शिरकाव केला आहे.नव्या कार्यकारिणीने सत्ता हाती घेतल्यानंतर परिषदेचा कारभार बदलण्याची घोषणा केली. बाल-युवा मंच, नाट्य विभाग, कॉफी टेबल, नवे कोरे तसेच बालकुमारांसाठी विशेष अंक, दिवाळी अंक सुरू करण्याची घोषणा केली. नव्या उपक्रमांना सुरुवात झाली; पण उपक्रम ठरले ते केवळ सुरू करण्यापुरते. हे उपक्रम ठेव म्हणून ठेवलेल्या निधीतील व्याजामधून सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. व्याज तर नियमित मिळत आहे; पण हे उपक्रम बंद का पडले, हे मात्र समजण्यापलीकडील आहे. लहान मुलांसाठी ‘मज्जाच मज्जा’ हा अंक सुरू करण्यात आला; पण अंक सुरू करण्यापूर्वी कार्यकारिणीची मंजुरी घेण्यात आली नाही. सरकारी कार्यालयांमध्ये ज्याप्रमाणे कार्योत्तर परवानगी घेतली जाते, तशी परवानगी यासाठी घेण्यात आली. दिवाळी अंक सुरू केला; पण ज्यांना अनुभव नाही अशांकडे अंकाची जबाबदारी दिली. विक्रीची व्यवस्था नसल्याने बराच अंक रद्दीत पडला आहे. ‘अंक हातोहात खपेल’ ही भावना फोल ठरली आहे.ज्यांचा साहित्यक्षेत्राशी संबंध नाही, अशा व्यक्ती साहित्य परिषदेशी जोडल्या जाव्यात, यासाठी कॉफी टेबल हा उपक्रम सुरू करण्यात आला; मात्र तोही बंद पडला. ‘नवं कोरं’ हा उपक्रम ओळखीच्या लोकांसाठी राबविला गेला की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. परिषदेच्या या सावळ्या गोंधळासंदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, तरच परिषदेचा कारभार समाधानकारक होऊ शकतो; अन्यथा परिषदेच्या कारभारला सरकारी कार्यालयाचे स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही.