शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या १३ वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे; पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

पुणे : स्वत:च्याच १३ वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ४६ वर्षीय बापाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार ...

पुणे : स्वत:च्याच १३ वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ४६ वर्षीय बापाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला.

संबंधित मुलीच्या आईनेच याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १४ जून २०१४ आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ही घटना घडली. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. फिर्यादी या कोथरूड परिसरात त्यांचा पती, दोन मुली आणि मुलासह राहातात. त्यातील सर्वात लहान मुलीवर अत्याचार झाले आहेत. फिर्यादी या घरकाम करतात. रात्रीच्या वेळी आणि पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत तो मुलीसोबत अश्‍लील चाळे करीत. फिर्यादीला तीन महिन्यांपासून वडिलांचा मुलीसोबत वागण्यातील वेगळेपणा जाणवला. त्यावेळी विश्‍वासात घेऊन तिने पीडितेला याबाबत विचारणा केली. यावेळी घडलेला प्रकार समोर आला. त्यावेळी फिर्यादी यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसात फिर्याद दिली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.