शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या  वैद्यकीय तपासणीवर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 21:16 IST

तृतीयपंथीयांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र देण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अशाप्रकारे त्यांची तपासणी करणे म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

पुणे : तृतीयपंथीयांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र देण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अशाप्रकारे त्यांची तपासणी करणे म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार ही तपासणी बेकायदेशीर ठरते. त्यामुळे ही तपासणी करू नये, अशी कायदेशीर नोटीस जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण, फरासखाना पोलिस ठाणे व ससून रुग्णालयाला पाठविण्यात आली आहे.

           काही व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे भासवून नागरिकांची लुट करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी व खरे तृतीयपंथी ओळखता यावेत यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी दिली होती. ससून रुग्णालयामध्ये ही तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. मानवी हक्क कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी या तपासणीला आक्षेप घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले लिंग ठरविण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने लैंगिक तपासणीसाठी कोणावर दबाव टाकता येणार नाही. लैंगिकता ही प्रत्येकाच्या सन्मानाची आणि वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याची तपासणी करणे मानवी हक्कांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे प्राधिकरण, ससून रुग्णालय किंवा फरासखाना पोलिस ठाण्याला तृतीयपंथियांची तपासणी करून तसे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. 

           याबाबत त्यांनी तिनही संस्थांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांची वैद्यकीय तपासणी करू नये. अशी तपासणी केल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याची तक्रार घेऊन मानवी हक्क आयोग तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात जाऊ, असे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरMedicalवैद्यकीय