शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

महाराष्ट्रात दोन वर्षांत बिबट्यांची संख्या दुप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST

श्रीकिशन काळे पुणे : देशात बिबट्यांच्या गणनेचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रात १६९० बिबटे दाखवले आहेत. परंतु, या ...

श्रीकिशन काळे

पुणे : देशात बिबट्यांच्या गणनेचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रात १६९० बिबटे दाखवले आहेत. परंतु, या अहवालातील आकडे चुकीचे असून, गेल्या अहवालात आणि यात खूप तफावत दिसत आहे. दोन वर्षांमध्ये एकदम बिबट्यांची संख्या दुप्पट झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होते. तर चार वर्षांत ६० टक्के बिबट्यांत वाढ झाल्याचे दिसते. त्यातही अभयारण्याबाहेरील क्षेत्रातील बिबट्यांची गणनाच केलेली नाही. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांनी या अहवालावर आक्षेप नोंदवले आहेत.

हा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन ॲथॅारिटी आणि वाइल्डलाइफ इन्स्टिस्टूट ऑफ इंडिया, देहराडून यांनी तयार केला. महाराष्ट्रात २०१४ मध्ये ७०० बिबटे होते. तर २०१८ मध्ये ९०० नोंदवले गेले. त्यात २०० मृत्यू झाले. त्यानंतर आता राज्यात एकदम १६९० बिबटे असल्याचे अहवालात नमूद आहे. त्यातही ही संख्या फक्त अभयारण्य आणि संरक्षित क्षेत्रातीलच आहे. खरंतर आज चंद्रपूर, नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातही बिबटे दिसत आहेत. तसेच उसात राहणाऱ्यांची संख्याच मोजलेली नाही. प्रजननाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील बिबट्यांची संख्याही अंदाजे १२०० च्या जवळपास असायला हवी होती. पण ती थेट १७००च्या जवळ गेली आहे.

जर दोन वर्षांत बिबट्यांची संख्या दुप्पट झाली असेल, तर मग भविष्यात हे बिबटे किती धुमाकूळ घालू शकतात, त्याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे आताच या बिबट्यांचे व्यवस्थापन करायला हवे. त्यांचे धोरण ठरवायला हवे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक आणि माजी वनअधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी दिली.

===================

भीमाशंकर अभयारण्यातील बिबटे गेले कुठे?

भीमाशंकर अभयारण्यात आता एकही बिबट्या दाखवलेला नाही. खरं तर भीमाशंकरला १९८६ मध्ये १० बिबटे होते. त्यानंतर २००६ मध्ये ३ होते. त्यानंतर गेल्या वर्षी तर एकही बिबट्या तिथे दिसला नाही. मग हे बिबटे गेले कुठे? हे सर्व बिबटे आता उसाच्या शेतात जुन्नर, नारायणगाव व इतर परिसरात राहत आहेत. मग या बिबट्यांची गणना कोण करणार? त्यांची संख्या मोठी असणार आहे, असेही कुकडोलकर म्हणाले.

===========================

राज्यातील बिबट्यांची गणना

२०१४ - ७००

२०१८ - ९००

२०२० - १६९०

======================

गणना करण्याची पूर्वीची अन‌् आताची पद्धत

पुर्वी बिबट्यांची गणना त्यांचे ठसे पाहून वन विभागातर्फे केली जात असे. पण आताची गणना कॅमेरे लावून केली आहे. त्यामुळे यामध्ये घोळ होऊ शकतो. एक बिबट्या जर दोन राज्याच्या सीमारेषेवर असेल, तर तो कधी या राज्यात तर कधी दुसऱ्या राज्यात जाईल. मग त्याची नोंद दोन्ही राज्यांत होईल. परिणामी बिबट्यांची संख्या वाढते, असेच काही तरी या अहवालात झाले असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले आहे.

=======================