शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

महापालिकेच्या माथी आता इतर गावांच्या कचऱ्याचा भार

By admin | Updated: February 19, 2016 01:46 IST

कचरा टाकू देणार नाही, टाकायचाच असेल तर आमच्या गावात विकासकामे करावी लागतील’ अशा अटी, शर्ती टाकून एकीकडे महापालिकेकडून आर्थिक

पुणे: ‘कचरा टाकू देणार नाही, टाकायचाच असेल तर आमच्या गावात विकासकामे करावी लागतील’ अशा अटी, शर्ती टाकून एकीकडे महापालिकेकडून आर्थिक सवलती लाटत असताना दुसरीकडे पालिका हद्दीवरच्या काही गावांमधून मात्र पालिका हद्दीत रोज कित्येक टन कचरा टाकला जात आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.महापालिका हद्दीला लागून गत काही वर्षांत अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच वस्त्याही असतात. ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या या परिसरातील कचऱ्याचे प्रमाण बरेच मोठे आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनाची काहीच सोय होत नसल्यामुळे या भागातील नागरिक त्यांचा सर्व कचरा महापालिका हद्दीत टाकत असतात. पालिका हद्दीत कचरा टाकणारी हद्दीवरची एकूण ७२ ठिकाणे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने शोधली आहेत. या ठिकाणांमधून रोज साधारण ५० टन कचरा पालिकेला जमा करावा लागत आहे. त्यात ओला, सुका तसेच अन्य प्रकारच्या कचऱ्याचाही समावेश आहे.धायरीगाव, नऱ्हे, आंबेगाव, हडपसर परिसरातील मांजरी, फुरसुंगी तसेच येवलेवाडी व अन्य गावे, कोंढवा परिसरातील गावे या ठिकाणांहून सर्वाधिक कचरा पालिका हद्दीत येत असतो. वाहने तसेच कर्मचारी स्वतंत्रपणे लावून पालिकेला तो जमा करावा लागतो. त्यासाठी वेगळा खर्च होतो. गावांमधील लोक कचरा पालिका हद्दीत आणून रिकामी जागा दिसेल तिथे टाकतात. पालिकेचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक हटकतात म्हणून रात्रीच्या सुमारास कचरा आणला जातो. असा ठिकठिकाणी जमा झालेला कचरा पालिकेला उचलावाच लागतो. उचलला गेला नाही तर नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात.हा त्रास कमी व्हावा म्हणून पालिका प्रशासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार कळवले. ग्रामपंचायतींना त्यांनी सूचना द्याव्यात, त्यांच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सोय त्यांनी लावावी असे त्यात म्हटले आहे. ग्रामपंचायतींनाही पत्रे पाठविण्यात आली. मात्र जिल्हा परिषद प्रशासन किंवा ग्रामपंचायतींनीही त्याची दखलच घेतलेली नाही. पालिकेकडून कचरा नियमित उचलला जात आहे हे लक्षात आल्यानंतर आता कचरा टाकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.