शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आता संत तुकाराम गाथा तेलुगू भाषेत

By admin | Updated: January 29, 2017 04:12 IST

आपल्या अभंगांतून समाजाला दिशा देणाऱ्या श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथेतील अभंगांची तेलुगू भाषकांनाही माहिती मिळणार आहे. सातशे पानांच्या या अभंगगाथेचे तेलुगूत भाषांतर करण्यात आले आहे.

पिंपरी : आपल्या अभंगांतून समाजाला दिशा देणाऱ्या श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथेतील अभंगांची तेलुगू भाषकांनाही माहिती मिळणार आहे. सातशे पानांच्या या अभंगगाथेचे तेलुगूत भाषांतर करण्यात आले आहे. श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथेत चार हजार ९२ अभंग आहेत. या अभंगांच्या माध्यमातून समाजाला एक दिशा मिळते. वारकरी संप्रदायात गाथेला मोठे महत्त्व आहे. मात्र, गाथेतील मराठी भाषेतील अभंग वाचणे इतर भाषिक भाविकांना शक्य होत नाही. अभंगरुपी विचार इतरांपर्यंतही पोहोचायला हवेत. यासाठी गाथेचे भाषांतर करण्यात आले आहे. सर्व अभंग तेलुगू भाषेत भाषांतरीत करण्यात आले आहेत. तुकोबारायांचे विचार गाथेच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्याच्या तुकोबारायांच्या गाथेचे राज्यासह परराज्यातही ठिकठिकाणी पारायण होत असते. या पारायणासाठी इतर भाषिक भाविकांचाही समावेश आहे. अशाच प्रकारे तेलंगणातील सुमारे पाचशे भाविक दर वर्षी मावळ तालुक्यातील भंडारा डोंगरावर गाथा पारायण करतात. मात्र, त्यांना भाषेची अडचण होती. तेलुगू भाषेतील गाथेने ही अडचण दूर झाली आहे.(प्रतिनिधी)भाविकांना पारायणासाठी सोयीस्करकर्णे गजेंद्र भारती महाराज, नारायणखेडकर महाराज, अवधूत महाराज एकंदेकर, ज्ञानेश्वरमहाराज एकंदेकर यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत गाथेचे भाषांतर केले आहे. तेलंगणा राज्यातील संगार्डी जिल्ह्यात श्री गजेंद्र आश्रम असून याच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथेही आश्रम आहेत. गजेंद्र आश्रमाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पारायण होत असते. तुकोबारायांच्या विचारांची इतरांनीही माहिती मिळावी, यासाठी गाथेचे भाषांतर करण्यात आले आहे. अभ्यासासाठी आणि पारायणासाठी आता तेलुगू भाषेतील गाथाही उपलब्ध झाल्याने भाविकांना सोयीचे झाले आहे. श्री संत तुकाराम महाराजांची गाथा मराठी भाषेत आहे. तेलुगू भाषिक-भाविकांना पारायण करायचे असल्यास अडचण निर्माण होत होती. त्यासाठी तेलुगू भाषेत गाथेचे भाषांतर केले आहे. अनेक दिवस हे काम सुरु होते. - अवधूतमहाराज एकंदेकर