शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक न्यायालयात पक्षकारांसाठी आता ओळखपत्र : अनावश्यक गर्दी होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 20:46 IST

कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ सुरू झाल्यापासून याठिकाणी दाखल होणा-या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ठळक मुद्देयेत्या एक जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणारभारती विद्यापीठ इमारतीमध्ये पूर्वीही संकल्पना राबविण्यात आली.प्रत्येक तारखेच्या वेळी पक्षकाराने ओळखपत्र आणणे बंधनकारक

पुणे : पक्षकाराची माहिती आणि त्यांची पुढील सुनावणीची तारीख असा उल्लेख असणारे ओळखपत्र आता यापुढे कौटुंबिक न्यायालयात येणा-या व्यक्तींना देण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आवारात सुरक्षा राहावी आणि पक्षकारांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.      येत्या एक जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कौटुंबिक वादातून दोन्ही बाजुंच्या लोकांमध्ये न्यायालयाच्या आवारातच भांडणे होतात. तसेच गेल्या काही दिवसांत वकिलांवर होणा-या हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहे. बुधवारीच एका वकिलावर न्यायालयाच्या इमारतीमध्ये हल्ला झाला होता. तसेच ही संकल्पना पूर्वी भारती विद्यापीठ इमारतीमध्ये राबविण्यात आली होती. त्यामुळे आता शिवाजीनगर येथे सुद्धा ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फॅमिली कोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांनी दिली. कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ सुरू झाल्यापासून याठिकाणी दाखल होणा-या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी भारती विद्यापीठभवन येथे सातव्या आणि नवव्या मजल्यावर न्यायालयाचे कामकाज चालत होते. मात्र तेथील जागा अपुरी पडू लागल्यामुळे नवीन इमारतीची उभारणी करून शिवाजीनगर येथे स्थलांतर करण्यात आले आहे.       प्रकरणे वाढल्यामुळे न्यायालयात येणा-या व्यक्तींची संख्या देखील वाढली आहे. याठिकाणी दररोज सुमारे दोन हजार लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवू लागला होता. या सर्व बाबी विचारात घेवून आता पक्षकारांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ओळखपत्रावर संबंधित पक्षकाराचे नाव, त्याची कोणत्या कोर्टात केस सुरू आहे, पुढील तारीख कधी आहे याची नोंद असेल. न्यायालय प्रशासनाकडून ही ओळखपत्र छापून देण्यात येणार आहे. त्यावर सुमारे ६० तारखांची नोंद करता येणार आहे. पक्षकाराने प्रत्येक तारखेच्या वेळी ते ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे, असे अ‍ॅड. कवडे यांनी सांगितले.   पक्षकाराबरोबर एकाच व्यक्तीला मिळणार प्रवेश तारखेसाठी पक्षकाराबरोबर सरासरी तीन व्यक्ती न्यायालयात येत असतात. मात्र, ओळखपत्र बंधनकारक करण्यात आल्यानंतर न्यायालयातील गर्दीवर नियंत्रण येणार आहे. कारण ओळखपत्र असलेल्या पक्षकाराबरोबर केवळ एकाच व्यक्तीला न्यायालयात प्रवेश दिला जाणार आहे. तर आत जाऊ न दिल्याने परिसरातील गर्दी वाढणार आहे. तसेच प्रवेश नाकारला म्हणून गेटवर हुज्जत घालण्याचे प्रकार होण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय