शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्रच्या ‘सीईटी’साठी आता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 17:56 IST

राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.

ठळक मुद्देतंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) सीईटीचा अभ्यासक्रम, पॅटर्न याबाबतची माहिती प्रसिध्द केली आहेदेशपातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ‘जेईई’ व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ या परीक्षा ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमानुसार घेतल्या जातात.

पुणे : राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. मे २०१८ मध्ये होणार्‍या सीईटीपासून हा बदल लागु केला जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) सीईटीचा अभ्यासक्रम, पॅटर्न याबाबतची माहिती प्रसिध्द केली आहे. मागील वर्षीपर्यंत ही परीक्षा केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत घेतली जात होती. देशपातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ‘जेईई’ व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ या परीक्षा ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमानुसार घेतल्या जातात. त्यामध्ये राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम तुलनेने मागे असल्याचे विद्यार्थी-पालक तसेच तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. त्यामुळे राज्य शासनाने इयत्ता अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याबरोबरच सीईटीचा अभ्यासक्रम, काठिण्यपातळी, पॅटर्नमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार मे २००८ मध्ये होणारी सीईटी या बदलांप्रमाणे घेतली जाणार आहे. यामध्ये महत्वाचा बदल म्हणजे या परीक्षेमध्ये आता राज्य मंडळाचा अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के महत्त्व दिले जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग पद्धत या परीक्षेसाठी नसेल. ‘सीईटी’साठी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांची काठिण्यपातळी ‘जेईई (मेन्स)’प्रमाणे तर जीवशास्त्र विषयाची काठिण्यपातळी नीटप्रमाणे असेल. परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांच्या तीन प्रश्नपत्रिका असतील. ‘सीईटी’साठी चारही विषयांचा इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रमही डीटीईने प्रसिध्द केला आहे.