शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीत जाहिरात केल्याबाबत नाेटीस; मंडळांचे कार्यकर्ते झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 23:07 IST

दंड भरण्याच्या नोटिसीबाबत सोमवारी बैठक घेऊन निर्णय.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :दहीहंडी उत्सवकाळात मंडळांच्या परिसरात जाहिरात लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने उद्योजक पुनीत बालन यांना शुल्क भरण्याची नोटीस पाठवली. या विराेधात मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेवर निषेध मोर्चा काढत या नोटिसीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार  यांनी येत्या सोमवारी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत शुल्क भरण्यास स्थगिती दिली आहे.

गणेश मंडळाचे कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे, नितीन पंडित, पुष्कर तुळजापूरकर, राजेंद्र काकडे, संजय देशमुख, श्याम मारणे, अक्षय माने, राजेंद्र देशमुख, विनोद सातव यांच्यासह कार्यकर्ते माेठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.

होर्डिंगवर कारवाई करताना महापालिका त्या होर्डिंगवर जाहिरात असलेल्या कंपन्यांना दोषी धरत नाही, तर होर्डिंग मालकावर कारवाई होते. मग या घटनेत जाहिरात कंपनीला नोटीस देण्याचा प्रकार माधव जगताप यांनी केला. त्यामुळे कारवाईच्या हेतूबद्दलच शंका निर्माण होते. कोरोनानंतर मंडळांना वर्गणी मिळण्यात अडचणी येत असताना पुनीत बालन यांनी मोठा आर्थिक हातभार लावला. दुसरीकडे मंडळांसाठीचे जाहिरात शुल्क माफ करण्याच्या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून महापालिका अधिकारी मनमानी काम करत आहेत. त्यामुळे पुनीत बालन यांना दिलेली नोटीस मागे घ्यावी; अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारू, असा इशारा शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यावर पुनीत बालन यांना दंडाची नोटीस पाठवली नाही, असे डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.राज्य सरकारने गणेश मंडळांना उत्सव काळात जाहिरात शुल्क माफ केले आहे. दहीहंडी आणि गणेशाेत्सव काळात लावलेल्या जाहिरातींचे शुल्क आकारले आहे. तो दंड नसून जाहिरात शुल्क आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत ती रक्कम भरण्यास स्थगिती देत आहोत. - डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त 

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीPuneपुणे